गोवा विधानसभा अधिवेशन: विधानसभेत घुमला आमका नका गोव्यात कोळसा नाका घोषणांचा आवाज

गोमंन्तक वृत्तसेवा
मंगळवार, 26 जानेवारी 2021

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी हे अभिभाषण करून विधानसभेतून जात असताना विरोधी आमदारांनी कोळसा विरोधी घोषणा दिल्या. कोळसा नको, कोळसा नको, गोव्यात आम्हाला कोळसा नको, अशा या घोषणा देईपर्यंत राज्यपाल विधानसभेतून निघून गेले होते.

पणजी:  राज्याच्या काही भागात सुरू असलेल्या कोळसा विरोधी आंदोलनाचा आवाज आज विधानसभेत पोचला. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी हे अभिभाषण करून विधानसभेतून जात असताना विरोधी आमदारांनी कोळसा विरोधी घोषणा दिल्या. कोळसा नको, कोळसा नको, गोव्यात आम्हाला कोळसा नको, अशा या घोषणा देईपर्यंत राज्यपाल विधानसभेतून निघून गेले होते.

विरोधी आमदार आज काहीतरी करणार याची कल्पना ते दंडाला काळ्या फिती बांधून आले, तेव्हाच आली होती. नावेलीचे आमदार लुईझिन फालेरो, कुडतरीचे आमदार आलेक्स रेजिनाल्ड लॉरेन्स आदींच्या हातात फलक होती. रेजिनाल्ड निसर्ग वाचविण्याची हाक रोमन लिपीतील कोकणीतून लिहून आणली होती. विधानसभेचे कामकाज सुरू होण्यापूर्वी सत्ताधारी गटातील काही जणांनी कुतूहलाने त्या फलकांवर नजरही टाकली होती. विरोधक राज्यपालांच्या भाषणावेळी घोषणा देणार की नाही, हे त्यावेळी समजून येत नव्हते.

राज्यपाल कोश्यारी यांनी साडेअकरा वाजता विधानसभेत प्रवेश केला. राष्ट्रगीताची धून वाजवली गेल्यानंतर सभापती राजेश पाटणेकर यांनी राज्यपालांना अभिभाषण करण्याची विनंती केली. राज्यपालांनी भाषण वाचण्यास सुरवात केली, जेमतेम तीन मिनिटे झाल्यावर आपणास थोडी अडचण आहे, माझे उर्वरित भाषण मी वाचले असे माना असे सांगत राज्यपालांनी शांती मंत्राचे पठण केले. त्यानंतर पुन्हा राष्ट्रगीताची धून वाजवून झाल्यानंतर ते विधानसभेबाहेर जाताना हे फलक फडकावण्यात आले आणि घोषणाबाजी झाली. आमदार सुदिन ढवळीकर, आमदार रोहन खंवटे, आमदार जयेश साळगावकर, आमदार विजय सरदेसाई, आमदार विनोद पालयेकर, आमदार रवी नाईक, आमदार लुईझिन फालेरो यांनी हे फलक फडकावले होते. या घोषणाबाजी करतेवेळी सांग्याचे आमदार प्रसाद गावकर हे दंडाला काळी फीत बांधून उभे होते. आमदार चर्चिल आलेमाव हेही यावेळी उभे राहिले होते.कामकाज पुन्हा सुरु झाल्यानंतर सभापतींनी विधिमंडळ सचिव नम्रता उल्मन यांना राज्यपालांचे भाषण सभागृह पटलावर ठेवण्याची सूचना केली. त्यांनी ते पटलावर ठेवल्यानंतर सभापतींनी दुखवटा ठराव मांडला, तो मिनिटभराच्या मौनानंतर संमत केला. त्यानंतर विधानसभा कामकाज समितीचा अहवाल पटलावर मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी मांडल्यावर पुन्हा कोळशाचा विषय ताजा झाला.

प्रजासत्ताक दिन 2021: गोव्याच्या या रक्षणकर्त्यांना राष्ट्रपती पदक जाहिर -

विरोधी पक्षनेते दिगंबर कामत म्हणाले, एक दिवसाच्या विधानसभा अधिवेशनावेळी झालेल्या विधानसभा कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीवेळी डिसेंबरमध्ये 20 दिवसांचे अधिवेशन घेण्याची मागणी केली होती. निदान आता तरी पूर्ण वेळेचे अधिवेशन घेणे अपेक्षित होते. आता केवळ तीनच दिवसाचे अधिवेशन आहे, त्यातील अर्धा दिवसही खासगी कामकाजासाठी जाणार आहे. त्यामुळे सरकारने हे पूर्णवेळेचे अधिवेशन घेतले असे म्हणता येणार नाही. निदान पुढील अर्थसंकल्पीय अधिवेशन २० दिवसांचे घेत त्यावर अर्थसंकल्पावर चर्चा करून तो मंजूर करून घ्यावा. लोकांचा आवाज आम्ही सरकारपर्यंत पोचवणार तर पन्नास विषय आहेत आणि ते पोचवण्यासाठी पुरेसा वेळ नाही. एवढ्या छोट्या वेळात राज्यभरातील लोकांचे प्रश्न आम्ही कसे मांडावे ते सरकारने  सांगावे.

संबंधित बातम्या