राज्यपाल मलिक यांची दुसऱ्यांदा साळावली धरणाला कौटुंबिक भेट

मनोदय फडते
मंगळवार, 18 ऑगस्ट 2020

राज्यपाल ३१ जुलै रोजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या निर्देशानुसार, साळावली धरण परिसरात भेट देऊन अधिकाऱ्यांकडून माहिती गोळा केली होती. आपण परत सप्टेंबर महिन्यात एक दिवस वास्तव्य करण्यासाठी साळावली परिसरात येणार असल्याचे प्रसिद्धी माध्यमाशी बोलताना स्पष्ट केले होते. पण, साळावलीचा मोह राज्यपालाच्या कुटुंबियांना आवरता न आल्याने अवघ्या अठरा दिवसांत दुसऱ्यांदा राज्यपालांनी साळावली धरण परिसराला भेट दिली. 

सांगे
राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी अठरा दिवसांत दुसऱ्यांदा साळावली धरणाला कौटुंबिक भेट देऊन किमान तासभर आनंद लुटला. ही भेट खासगी स्वरूपात असल्याने कोणालाही आगाऊ कल्पना देण्यात आली नव्हती. 
यापूर्वी राज्यपाल ३१ जुलै रोजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या निर्देशानुसार, साळावली धरण परिसरात भेट देऊन अधिकाऱ्यांकडून माहिती गोळा केली होती. आपण परत सप्टेंबर महिन्यात एक दिवस वास्तव्य करण्यासाठी साळावली परिसरात येणार असल्याचे प्रसिद्धी माध्यमाशी बोलताना स्पष्ट केले होते. पण, साळावलीचा मोह राज्यपालाच्या कुटुंबियांना आवरता न आल्याने अवघ्या अठरा दिवसांत दुसऱ्यांदा राज्यपालांनी साळावली धरण परिसराला भेट दिली. 
धरणावरून किमान अर्धा तास जलाशयाचा नेत्रसुखद नजारा लुटला. उंचावरून पडणाऱ्या पाण्यातून उडणारे मनमुराद तुषार राज्यपालांच्या कुटुंबीयांनी मनसोक्तपणे अंगावर झेलले. त्यानंतर हा लवाजमा धरणाच्या खालच्या भागात जाऊन उंचावरून पडणाऱ्या पाण्याचा प्रवाह जवळून न्याहाळला. किमान तासभर धरण परिसरात राज्यपाल आणि त्यांच्या कुटुंबियांनी आनंद लुटला. यावेळी जिल्हाधिकारी अजित रॉय, सांगेचे उपजिल्हाधिकारी अजय गावडे, मामलेदार मनोज कोरगावकर, जलसंपदा खात्याचे अधिकारी उपस्थित होते. राज्यपाल साळावलीत येणार म्हणून सकाळपासून सांगेचे पोलिस निरीक्षक सचिन पन्हाळकर, वाहतूक पोलिस निरीक्षक अर्जुन सांगोडकर यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता. 

संपादन ः संदीप कांबळे

संबंधित बातम्या