"गोव्याच्या राज्यपालांनी लोकहितार्थ निर्णय घ्यावा.."

दैनिक गोमंतक
मंगळवार, 24 नोव्हेंबर 2020

बेकायदेशीर रित्या पुन्हा पुन्हा काम सुरू करणे निषेधार्थ आहे. याविषयी गोव्याच्या राज्यपालांनी दखल घेऊन लोकांच्या हितार्थ निर्णय घ्यावा, अशी मागणी नावेली आमदार लुईझीन फालेरो यांनी केली.

सासष्टी: कोळसा वाहतुकीच्या पार्श्वभूमीवर करण्यात येणाऱ्या रेल्वे दुपदरीकरणास स्थानिकाद्वारे अनेकवेळा विरोध करण्यात येत असूनही बेकायदेशीर रित्या पुन्हा पुन्हा काम सुरू करणे निषेधार्थ आहे. याविषयी गोव्याच्या राज्यपालांनी दखल घेऊन लोकांच्या हितार्थ निर्णय घ्यावा, अशी मागणी नावेली आमदार लुईझीन फालेरो यांनी केली.

दवर्ली परिसरात परवानगी नसताना रेल्वेच्या दुपदरीकरणाच्या कामास सुरुवात करण्यात आल्याने स्थानिकांनी काम थांबवले. यावेळी स्थानिकांनी फालेरो यांना बोलावले असता फालेरो यांनी घटनास्थळी येऊन रेल्वे अधिकाऱ्यांशी चर्चा केली व त्यानंतर जमिनीची कागदपत्रे दाखविण्यास रेल्वे अधिकाऱ्यांना सांगितल्यावर रेल्वे पोलिसांनी उद्यापर्यंत वेळ मागून घेतला आहे. 

२०१७ पासून कोळसा वाहतुकीस विरोध करण्यात येत असून सरकारला जनहित डावलून रेल्वे रुळाचे दुपदरीकरण करण्याचा कुठलाही अधिकार नाही. राज्यपाल हे गोव्याचे प्रमुख असल्याने गोव्यात चाललेल्या कोळसा वाहतुकीच्या संदर्भात योग्य निर्णय घेणे आवश्यक आहे, असे  फालेरो यांनी सांगितले. रेल्वे रुळाचे दुपदरीकरण, कोळसा वाहतूक, नद्यांचे राष्ट्रीयीकरण हे धोकादायक ठरणाऱ्या प्रकल्पांना पूर्वीपासूनच विरोध करण्यात येत आहे. २०१७ मध्ये मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी कोळसा गोव्यात येणार नसल्याचे स्पष्ट केले होते तसेच सरकारने आताही स्पष्ट करावे, असेही त्यांनी स्पष्ट केले.

आणखी वाचा:

गोवा राज्य सरकारने केली ‘जेएसडब्ल्यू’ १५६ कोटी रुपयांची मागणी

-

संबंधित बातम्या