Govind Gaude: एसटी समाजात फूट पाडण्याचा प्रयत्न

‘उटा’ संघटनेमध्येच राजकीय आरक्षण मिळवून देण्याची ताकद
Govind Gaude
Govind GaudeGomantak Digital Team

आदिवासी कल्याण संचालनालय व युनायटेड ट्रायबल असोसिएशन्स अलायन्स (उटा) या संघटनेने आदिवासी समाजासाठी बलिदान दिलेल्या स्व. मंगेश गावकर व स्व. दिलीप वेळीप यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी मडगावच्या रवींद्र भवन सभागृहात प्रेरणा दिन कार्यक्रमाचे आज आयोजन केले होते. त्‍यावेळी ‘उटा’ संघटना व एसटी समाजामध्ये फूट पाडली जात आहे, असा आरोप करत कला व संस्कृती मंत्री गोविंद गावडे यांनी जोरदार समाचार घेतला.

‘काही लोक बलिदानाप्रति शोक प्रकट करण्यासाठी कार्यक्रम आयोजित करतात. पण, शोक प्रकट करणे म्हणजे एसटी समाजाच्या विकासाला खिंडार पाडणे नव्‍हे. आम्ही येथे समाजातील युवकांना या दोघांनी दिलेल्या बलिदानातून प्रेरित होऊन समाजाला उच्च शिखरावर पोहोचविण्यासाठी जमलो आहोत’, असे मंत्री गावडे यांनी स्पष्ट केले. ‘उटा संघटना व एसटी समाजामध्ये मुळीच फूट पडलेली नसून अफवा पसरविणाऱ्यांचा तो केवळ भ्रम आहे. केवळ उटा संघटनेमध्येच एसटी समाजाला राजकीय आरक्षण मिळवून देण्याची ताकद आहे’, असे गावडे यांनी आवर्जून सांगितले.

Govind Gaude
Panaji Smart City Work: मुख्यमंत्री म्हणतात, या पावसाळ्यात पणजीतील रस्त्यांवर पाणी येणार नाही; कारण...

तोपर्यंत लढा चालूच राहील

माजी आमदार वासुदेव मेंग गावकर यांनी एसटी समाजासाठी कार्यरत असलेल्या विविध विकास योजनांची माहिती दिली. सर्वांचे स्वागत करताना ‘उटा’चे अध्यक्ष प्रकाश वेळीप यांनी सांगितले की, ही क्रांतिकारी संघटना आहे. जोपर्यंत आमच्या सर्व मागण्या पूर्ण होत नाहीत, तोपर्यंत आमचा लढा चालूच राहील. राजकीय आरक्षण हा आमचा अधिकार आहे व तो मिळवल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही. यावेळी गोवा कमिशन एससी एसटीचे चेअरमन दीपक करमळकर यांनी आपले विचार व्यक्त केले.

Govind Gaude
Goa ST Community Reservation:...अन्यथा घटनात्मक पेचप्रसंग निर्माण करू; मेळाव्यातून एसटी नेत्यांचा इशारा

मंत्री सुभाष फळदेसाई यांचा आरक्षणाला पाठिंबा

मंत्री गावडे यांनी ‘उटा’ संघटनेमध्ये व एसटी समाजामध्ये फूट पाडण्याचा जे प्रयत्न करीत आहेत, त्यांना सावधानतेचा इशारा दिला. केवळ ‘उटा’ संघटनेमध्येच एसटी समाजाला राजकीय आरक्षण मिळवून देण्याची ताकद आहे, असेही ते म्‍हणाले. या कार्यक्रमाला उपस्थित असलेले समाज कल्याण मंत्री सुभाष फळदेसाई यांनी एसटी समाजाच्या राजकीय आरक्षणाला पूर्ण पाठिंबा जाहीर केला.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com