Govind Gawde: सडलेल्या डाळ प्रकरणात कोणत्याही चौकशीला सामोरे जाण्याची तयारी

अनागोंदी कारभारामूळे 241 टन तूरडाळ सडल्याने नागरिकात ही संताप
Govind Gawde
Govind GawdeDainik Gomantak

कोरोना काळात वाटपासाठी तूरडाळीचा अतिरिक्त साठा मागविण्यात आला होता. 169 टन डाळीचे वाटप झाले होते. मात्र उर्वरित 241 टन तूरडाळ ही न वाटता तशीच राहीली. यामूळे गोदामात सडलेल्या डाळ प्रकरणी तत्कालीन नागरी पुरवठा मंत्री गोविंद गावडे यांनी आज आपली भूमिका स्पष्ट केली.

( Govind Gawde say Ready to face any inquiry in 241 tonne rotten turdal case )

Govind Gawde
'Har Ghar Tiranga' यशस्‍वी करण्यासाठी भाजपचे मोर्चे सज्ज

तत्कालीन नागरी पुरवठा मंत्री गोविंद गावडे यांनी आपण कोणत्या ही चौकशी सामोरे जाऊ शकतो असे म्हटले आहे. तसेच इतक्या मोठ्या प्रमाणात डाळीचा साठा नागरिकांना न मिळता केवळ अनागोंदी कारभारामूळे सडल्याचा प्रकार समोर आल्याने यावर त्यांनी आपली नाराजी ही व्यक्त केली आहे.

Govind Gawde
गोव्यातील तरुणाचा पुण्यात गूढ मृत्यू

यावर स्पष्टीकरण देताना गावडे म्हणाले की, माझ्या लक्षात ही गोष्ट आली तेव्हा मी या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी समिती नेमली होती. माझ्याकडे याबाबतची सगळी कागदपत्रे आहेत. यात मी कोणाला थेट दोषी ठरवू शकत नाही. पण जर तत्कालीन अधिकाऱ्यांची जर काही चूक झाली असेल तर ते तपासणे गरजेचे असे ही गावडे म्हणाले आहेत.

169 टन डाळीचे वाटप; उर्वरित पडून

नागरी पुरवठा खात्याच्या कार्यालयातून मिळालेल्या माहितीनुसार 241 टन तूरडाळ सडली आहे. कोरोना काळात तूरडाळ साधारण दोनशे रुपयांच्यावर गेली होती आणि राज्य सरकारने नाफेडच्या माध्यमातून ती शंभर रुपयांखाली दरात खरेदी केली होती. मात्र सडल्याने आता नागरिकात यावरुन चांगलाच संताप आहे.

काही नागरिक आज ही आपल्या दोन वेळच्या जेवणासाठी काबाड कष्ट करतात. तर काही ना ही संधी ही न मिळत नसल्याने उपाशी पोटी झोपावे लागते की काय अशी स्थिती असताना या अनागोंदी कारभाराने सामान्यांना विचारच करावा लागत असल्याचे काही नागरिकांनी म्हटले आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com