गोविंद गावडे यांच्या भाजप प्रवेशामुळे पक्षाची ताकद वाढली!

पंधरा वर्षानंतर प्रियोळमध्ये (Priol) कमळ फुलवण्यास आम्ही सज्ज असल्याचे प्रियोळ भाजप मंडळाचे नवनिर्वाचित अध्यक्ष दिलीप नाईक यांनी सांगितले.
गोविंद गावडे यांच्या भाजप प्रवेशामुळे पक्षाची ताकद वाढली!
Govind GawadeDainik Gomantak

मडकई: गोविंद गावडे यांच्या भारतीय जनता पक्षातील प्रवेशामुळे पक्षाची ताकद वाढली असून भाजपमधील मूळ कार्यकर्ते अजूनही पक्षाबरोबर आहेत. पक्षाचा आदेश हा त्यांच्यासाठी सर्वोच्च आहे आणि पंधरा वर्षानंतर प्रियोळमध्ये (Priol) कमळ फुलवण्यास आम्ही सज्ज असल्याचे प्रियोळ भाजप मंडळाचे नवनिर्वाचित अध्यक्ष दिलीप नाईक यांनी सांगितले. (Govind Gawdes entry into the BJP increased the strength of the part)

Govind Gawade
Goa Crime News: सेक्स स्कँडलप्रकरणी संकल्प आमोणकर यांची चार तास जबानी

मंगळवारी गावडे (Govind Gawde) यांना प्रवेश दिल्यामुळे नाराज झालेल्या भाजप (BJP) पदाधिकाऱ्यांनी राजीनामे दिले. त्यांनी भाजपच्या कार्यशैलीवर टीकास्‍त्र सोडले होते. त्या टीकेला प्रत्युत्तर म्हणून पत्रकार परिषद झाली. राज्य कार्यकारिणी सदस्य दिगंबर तारी, सरचिटणीस शिवराम नाईक, सत्यवान शिलकर, वैशाली नाईक आदी कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते.

Govind Gawade
Michael Lobo: लोबोंच्या पक्षत्यागामुळे भाजपवर काडीचाही परिणाम होणार नाही

दिलीप नाईक म्हणाले, ज्यांनी राजीनामे दिले त्यांचे पक्षाकरिता योगदान नगण्य होते. आपल्या स्वार्थासाठी त्यांनी राजीनामे दिले आहेत. 90 टक्के पदाधिकाऱ्यांनी राजीनामा दिला हा त्यांचा दावासुध्दा खोटा आहे. बहुसंख्य कार्यकर्ते गोविंद गावडे यांच्याबरोबर व पक्षाबरोबर आहेत. प्रियोळमध्ये विकास करताना गावडे यांनी कसलाच भेदभाव केला नाही. गावडे यांनी भाजपच्या मूळ कार्यकर्त्यांवर अन्याय केला असे म्हणणे पूर्णपणे चुकीचे आहे.

महेश शिलकर यांनी मतदारसंघात भाजपचे दहा हजार पाचशे सभासद असल्याचे म्हटले आहे, ते सुध्दा चुकीचे आहे. इतरांनीही यावेळी प्रियोळमध्ये भाजप अधिक बलवान झाल्याचे नमूद केले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com