Vijay sardesai Latest Update: विजय सरदेसाई रिकामटेकडे! सततच्या आरोपांवर गोविंद गावडेंनी सोडले मौन

गोवा फॉरवर्डचे अध्यक्ष विजय सरदेसाईंना यांनी गेले काही दिवस धान्य चोरी प्रकरणावरून ‘गोवा फॉरवर्ड’चे आमदार विजय सरदेसाई यांनी सरकारला घेरण्याचा प्रयत्न केला आहे.
Vijay Sardesai And Govind Gaude
Vijay Sardesai And Govind GaudeDainik Gomantak

पणजी: गोवा फॉरवर्डचे अध्यक्ष विजय सरदेसाईंना यांनी गेले काही दिवस धान्य चोरी प्रकरणावरून ‘गोवा फॉरवर्ड’चे आमदार विजय सरदेसाई यांनी सरकारला घेरण्याचा प्रयत्न केला आहे. यावर क्रीडा मंत्री गोविंद गावडे यांनी मौन सोडले आहे. ते म्हणाले सध्या त्यांना काही काम नाही.

(Govind Gawde's reply to Goa Forward president Vijay Sardesai's persistent allegations)

Vijay Sardesai And Govind Gaude
Accident In Curchorem: कुडचडे येथे दोन दुचाकींचा भीषण अपघात! एक दुचाकीस्वार गंभीर जखमी

याला प्रत्युत्तर देताना कला व संस्कृतीमंत्री गोविंद गावडे यांनी आमदार सरदेसाई यांच्या आरोपांना खंडणीचा वास येत आहे, असा टोला लगावला आहे. ते पुढे म्हणाले, ठराविक लोकांवरच ते टीका करतात. ज्या गोष्टींवर बोलायला हवे त्यावर ते बोलत नाहीत.

‘सरदेसाई रिकामटेकडे’

धान्य चोरी प्रकरणावर मी का बोलावे? कारण माझ्याकडे आता हे खाते नाही. तरीदेखील सरदेसाई हे माझ्या नावाचाच जप करताहेत. यापूर्वी माझ्याकडे हा विभाग होता. त्यामुळे माझा कारभार राज्यातील नागरिकांना चांगलाच माहीत आहे. आता सरदेसाई यांना काहीच काम नाही. त्यामुळे ते केवळ आणि केवळ टीका करत आहेत, असे कला व संस्कृतीमंत्री गोविंद गावडे म्हणाले.

ते म्हणाले की, ज्या झाडाला फळे लागतात, त्याच झाडाला दगड मारण्याचा प्रयत्न केला जातो. त्यामुळेच गोव्याच्या कार्यक्षम प्रशासनावर सरदेसाई आरोप करत आहेत. आमदार सरदेसाई यांना आता स्वप्नातही गोविंद गावडेच दिसत आहेत.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com