सरकारतर्फे भाषा पुरस्कार जाहीर 

Bhasha puraskar
Bhasha puraskar

पणजी

गोवा सरकारच्या राजभाषा संचालनालयातर्फे भाषांच्या विकासांसाठी ‘भाषा पुरस्कार योजना’ राबविली जाते. मराठी, कोंकणी आणि संस्कृत भाषांच्या उन्नतीसाठी समर्पितपणे कार्य केलेल्या व्यक्तींना हा पुरस्कार देण्यात येतो. सरकारने वर्ष २०१८-१९ याकरिता भाषा पुरस्कार जाहीर केले आहेत. 
अॅड. उदय लक्ष्मीकांत भेंब्रे यांना ज्ञानपीठकार रवींद्र केळेकार कोंकणी भाषा पुरस्कार, पुंडलीक शिवराम नार्वेकर यांना ‘बा. द. सातोस्कर मराठी भाषा पुरस्कार’ तर देवदत्त गोविंद पाटील यांना दुर्गाराम उपाध्ये संस्कृत भाषा पुरस्कार दिला जाणार आहे. मानपत्र, 
स्मृतिचिन्ह, शाल, श्रीफळ व प्रत्येकी रोख एक लाख रुपये असे या पुरस्काराचे स्वरुप आहे. या पुरस्कारांचे वितरण एका विशेष कार्यक्रमामध्ये केले जाईल. 
मराठी, कोकणी व संस्कृत भाषांची उन्नती आणि संवर्धनासाठी निरपेक्षपणे कार्य करणाऱ्या व्यक्तींना भाषा पुरस्कार योजनेअंतर्गत हा पुरस्कार देण्यात येतो. या पुरस्कारासाठी निवड करण्यासाठी तज्ज्ञ समिती नियुक्त करण्यात आली होती त्यामध्ये श्री. दामोदर मावजो, डॉ. सोमनाथ कोमरपंत, श्री. लक्ष्मण पित्रे, गोवा कोंकणी अकादमीचे अध्यक्ष, राजभाषा संचालक आणि सहायक संचालक, राजभाषा संचालनालय यांचा समावेश होता.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com