सरकारी खात्यांना हिशेब, ताळेबंदचे वावगे

accounts
accounts

पणजी

राज्य सरकारने सध्या महसूल वाढीकडे लक्ष पुरवले आहे. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत हे महसूल वाढीच्या अभिनव कल्पना आणि महसूल गळती कमी करण्यासाठी खातेवार बैठका घेऊन आढावा घेत आहेत. या दरम्यानच काही सरकारी महामंडळांनी आपले गेल्या काही आर्थिक वर्षातील हिशेब आणि ताळेबंद तयारच केला नसल्याची माहिती उघड झाली आहे.
अशा वित्तीय बेजबाबदारपणे वागणाऱ्यांत गोवा फलोत्पादन महामंडळ, माहिती तंत्रज्ञान महामंडळ, गोवा वनविकास महामंडळ, गोवा राज्य अनुसूचित जाती, इतर मागासवर्गीय वित्त व विकास महामंडळ, इमेजिन पणजी स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट लिमिटेड, गोवा ऑटो ॲसेसरीज लिमिटेड (अवसायनात गेलेली), गोवा माहिती तंत्रज्ञान विकास महामंडळ, गोवा औद्योगिक विकास महामंडळ, वीज खाते, नदी परिवहन खाते यांचा समावेश आहे. काहींनी एका वर्षांसाठी, तर अन्य खाते महामंडळांनी १३ वर्षांपर्यंत हिशेबच सादर केला नसल्याची धक्कादायक माहिती मिळाली आहे. तशी स्पष्ट नोंद केंद्र सरकारच्या प्रधान लेखापालांनी राज्य सरकारला लिहिलेल्या पत्रात केली आहे.

काहीही करा, पण
आजपर्यंत हिशेब सादर करा

याबाबत वित्त अवर सचिवांनी कृषी संचालनालय, माहिती तंत्रज्ञान संचालनालय, प्रधान मुख्य वन संरक्षक, समाजकल्याण संचालनालय, पालिका प्रशासन संचालनालय, उद्योग, व्यापार आणि वाणिज्य संचालनालय, मुख्य विद्युत अभियंता, बंदर कप्तान खाते यांना पत्रे लिहिली आहेत. अवर सचिव (वित्त) यांनी या खातेप्रमुखांना ३१ मार्चपूर्वीचा हिशेब आणि ताळेबंद तयार करण्याची आवश्यकता आहे, असे पत्र लिहून कळवले आहे. केंद्र सरकारच्या प्रधान लेखापालांनी वित्त सचिवांना याबाबत पत्र पाठवल्याचा उल्लेखही या पत्रात केला आहे. यामुळे कोणत्याही परिस्थितीत आज(ता.२६) पर्यंत सर्व हिशेब पूर्ण करण्यास बजावले आहे. उद्याची तारीख या पत्रात ठळकपणे नोंदवण्यात आली आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com