Goa: गावडा समाजबांधवांची पोलिसांत तक्रार; मंत्री गोविंद गावडेंविरोधातील आक्षेपार्ह मजकुराबाबत नाराजी

दैनिक गोमंतक
सोमवार, 7 जून 2021

या तक्रारीच्या प्रती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, पोलिस महानिरीक्षक तसेच अन्य सर्व संबंधितांना देण्यात आल्या आहेत. 

फोंडा: गावडा समाज व कला संस्कृती (Culture) खात्याचे मंत्री गोविंद गावडे (Govind Guade) यांच्याबद्दल समाजाला उद्देशून आक्षेपार्ह मजकूर (Offensive text) फेसबूकमध्ये टाकल्याबद्दल म्हापसा येथील सुदीप दळवी याच्याविरोधात आज (रविवारी) फोंडा पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली आहे. युनायटेड ट्रायबल्स असोसिएशन अलायन्सचे अध्यक्ष तथा माजी मंत्री प्रकाश वेळीप यांनी ही तक्रार फोंडा पोलिस स्थानकाचे निरीक्षक मोहन गावडे यांच्याकडे दिली. यावेळी गावडा समाजाचे इतर प्रतिनिधी उपस्थित होते. (Gowda community members lodge a complaint with the police regarding the offensive text against Minister Govind Gawade)

सुदीप दळवी याने गेल्या 4 तारखेला फेसबूकवर गावडा समाजाला काष्टीकार असे संबोधताना लुई फिलिप या कंपनीच्या महागड्या शर्टचे लिंक काष्टीशी लावले आहे. समाजाबद्दल अन्य आक्षेपार्ह मजकूरही फेसबूकवर टाकण्यात आल्याने या प्रकारामुळे कला संस्कृती खात्याचे मंत्री गोविंद गावडे यांची बदनामी करण्याचे हे षडयंत्र असून या प्रकारामुळे गावडा समाजाच्या भावना दुखावल्याने राज्यातील शांतता भंग पाऊ शकते, अशी भीती व्यक्त करण्यात आली आहे. या तक्रारीच्या प्रती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, पोलिस महानिरीक्षक तसेच अन्य सर्व संबंधितांना देण्यात आल्या असून संशयिताविरुद्ध त्वरित कारवाई करावी, अशी मागणी प्रकाश वेळीप यांनी केली आहे.
Vaccination: गोमंतकीयांना दोन्ही लस दिल्‍यानंतरच विधानसभा निवडणूक घ्या : सरदेसाई

आदिवासी कर्मचारी महासंघाकडून निषेध
गावडा समाजाला उद्देशून फेसबूकवर सुदीप दळवी याने आक्षेपार्ह पोस्ट टाकल्याबद्दल अखिल भारतीय आदिवासी कर्मचारी महासंघ गोवा विभागातर्फे निषेध व्यक्त करण्यात आला आहे. एखाद्या समाजाबद्दल आक्षेपार्ह पोस्ट टाकून मानहानी करणे गैर असून सुदीप दळवी याच्याविरुद्ध सरकारने चौकशी करून योग्य कारवाई करावी, असे महासंघाने प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे.

संबंधित बातम्या