तमनार वीज प्रकल्पासाठी सुरु असलेली झाडांची कत्तल थांबवण्यासाठी गोयात कोळसो नाका संघटनेचे आंदोलन

गोमन्तक वृत्तसेवा
सोमवार, 7 डिसेंबर 2020

तमनार वीज प्रकल्पासाठी सुरु असलेली झाडांची कत्तल थांबवा आणि वृक्ष तोडीस दिलेली परवानगी मागे घ्या, अशी मागणी करत गोयात कोळसो नाका संघटनेतर्फे पणजी येथील वन खात्याच्या मुख्यालयासमोर आंदोलन करण्यात आले.

 

पणजी : गोव्यात सुरू असलेल्या कोळसाविरोधाच्या पार्श्वभूमीवर तसंच मोले अभयारण्यामधून जात असलेल्या तमनार वीज प्रकल्पासाठी सुरु असलेली झाडांची कत्तल थांबवा आणि वृक्ष तोडीस दिलेली परवानगी मागे घ्या, अशी मागणी करत गोयात कोळसो नाका संघटनेतर्फे पणजी येथील वन खात्याच्या मुख्यालयासमोर आज आंदोलन करण्यात आलं.

 

याआधी कोळसा व दुपदरी रेल्वे मार्ग तसेच मोले प्रकल्पासाठी तोडण्यात येणाऱ्या झाडांबाबत मलाही चिंता आहे असे मुख्यमंत्री म्हणाले होते. हरित गोव्याच्या संरक्षणासाठी सरकार प्रयत्नशील असल्याचेही त्यांनी सांगितले होते. परंतु या प्रकल्पासाठी वृक्षतोड सुरूच असल्याने तसेच कोळसा प्रश्न सोडवावा याकरिता सरकारने प्रयत्न करावेत म्हणून आज पुन्हा आंदेलन करण्यात आले.

 

याआधी तमनार वीज प्रकल्पाबाबत बोलताना मुख्यमंत्र्यांनी सांगितले होतो, ७० हजार झाडांची कत्तल केली जाणार नाही. फक्त सहाच खांब उभारण्यात येणार आहेत. या प्रत्येक खांबासाठी जी झाडे तोडावी लागतील तेवढीच कापली जातील. राज्यात वीजनिर्मिती होत नाही त्यामुळे कर्नाटकातून ही वीज गोव्याला घ्यावी लागते. राज्यात उद्योगासाठी विजेची गरज आहे. उद्योग आले तर गोमंतकियांना नोकऱ्या मिळतील. सौर ऊर्जा योजना सरकारने काढली मात्र फक्त २९ जणांनीच त्याचा फायदा घेतला आहे. त्यामुळे आवश्‍यक असलेली वीज कर्नाटकमधून आणण्यासाठी मोलेतून वीज वाहिनीसाठी खांबे उभारण्यापासून पर्याय नाही मात्र कमीत कमी झाडांची कत्तल होईल याबाबत सरकार लक्ष देणार आहे.

 

अधिक वाचा :

राष्ट्रपतींच्या स्वागतासाठी राजधानी पणजीत रंगरंगोटी

कळसाचे पाणी वळविल्याने म्हादईवर संकट 

गोव्यातील विकासकामे पूर्ण करण्यासाठी सरकार करणार थकबाकीची वसुली ; राज्यावरील कर्जाचा बोजा २ हजार कोटींवर

 

संबंधित बातम्या