Congress Protest: भाजप विरोधात जुने गोवे येथे काँग्रेसचे 'सत्याग्रह' आंदोलन

काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांची आज दुसऱ्यांदा ईडी कडून चौकशी केली जाणार आहे.
GPCC satyagrah at Old Goa
GPCC satyagrah at Old Goa Dainik Gomantak

नॅशनल हेराल्ड प्रकरणी (National Herald) आज (26 जुलै) काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी (Sonia Gandhi) यांची ईडीकडून चौकशी होणार आहे. संध्याकाळी उशीरापर्यंत ही चौकशी सुरू राहण्याची शक्यता आहे. दरम्यान या सगळ्या प्रकरणात काँग्रेसकडून देशभर आंदोलन केले जात आहे. जुने गोवे येथे गोवा प्रदेश काँग्रेसकडून (GPCC) शांततेत 'सत्याग्रह' आंदोलन करत, भाजपचा (BJP) निषेध करण्यात आला.

नॅशनल हेराल्ड प्रकरणी काँग्रेसचे नेते राहूल गांधी (Rahul Gandhi) आणि काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी (Sonia Gandhi) यांची ईडीकडून चौकशी केली जात आहे. मागील आठवड्यात गुरूवारी सोनिया गांधी यांची चौकशी केली होती. त्यानंतर आज दुसऱ्यांदा चौकशी होणार आहे. ईडीकडून (ED) आज सोनिया गांधी यांना जवळपास 36 प्रश्न विचारले जाणार असल्याची माहिती आहे. सोनिया गांधी यांच्यासह चौकशी दरम्यान प्रियंका गांधी-वाड्रादेखील (Priyanka Gandhi Vadra) उपस्थित राहणार आहेत.

GPCC satyagrah at Old Goa
Panchayat Election: अखेरच्या दिवशी 1,499 अर्ज, एकूण 6,256 अर्ज दाखल ; उद्या छाननी

दरम्यान या चौकशी विरोधात देशभर काँग्रेसचे नेते आणि कार्यकर्ते चांगलेच आक्रामक झाले आहेत. भाजप राजकारणासाठी सूडबुद्धीने वागत असून, केंद्रिय यंत्रणांचा चूकीच्या पद्धतीने वापर करत असल्याचा आरोप केला आहे.

नेमकं प्रकरण काय आहे?

भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू (Pandit Nehru) यांनी 1938 साली नॅशनल हेराल्ड हे वृत्तपत्र सुरू केले. 'असोसिएटेड जर्नल्स लिमिटेड' (AJL) (Assosiate Journal) नावाच्या कंपनीकडे हे वृत्तपत्र चालवण्याची जबाबदारी होती. 70 वर्षांनंतर 2008 मध्ये हे वृत्तपत्र तोट्यात गेल्यामुळे बंद करावे लागले. काँग्रेसने पक्ष निधीतून AJL ला 90 कोटी रुपयांचे बिनव्याजी कर्ज दिले. सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांनी 2010 मध्ये 'यंग इंडियन' (Young Indian) नावाची नवी कंपनी स्थापन केली. असोसिएटेड जर्नल्सला दिलेल्या कर्जाच्या बदल्यात यंग इंडियनला (Young Indian) कंपनीत 99 टक्के हिस्सा मिळाला. सोनिया आणि राहुल गांधी यांची यंग इंडियन कंपनीत 38-38 टक्के हिस्सेदारी आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com