गोवा लोकसेवा आयोग भरतीसाठी ऑक्टोबरमध्ये जीपीएससी परीक्षा

गोमन्तक वृत्तसेवा
शनिवार, 12 सप्टेंबर 2020

उच्च शिक्षण, नागरी हवाई वाहतूक, आरोग्य सेवा, दंत वैद्यकीय, वैद्यकीय महाविद्यालय, खाण, कौशल्य विकास, पशुवैद्यकीय आदी खात्यांत ही भरती राजपत्रित अधिकारी पदासाठी होणार आहे.

पणजी: गोवा लोकसेवा आयोग मोठ्या प्रमाणावर भरती करणार आहे. यासाठी आता ९, १० व ११ ऑक्टोबर रोजी संगणकावर आधारीत परीक्षा घेण्यात येणार आहे. १ हजार ७०० जण ही परीक्षा देणार आहेत.

एका ठिकाणी १५ जणांनी परीक्षा द्यावी अशी व्यवस्था आयोगाने केली आहे. आरोग्य सेतू ॲपचा वापर या परीक्षेसाठी येणाऱ्या उमेदवारांसाठी अनिवार्य केला असून निर्जुंतुकीकरणाचे सर्व नियम पाळले जाणार आहे, असे आयोगाचे अध्यक्ष जुझे मान्युएल नरोन्हा यांनी कळवले आहे.

उच्च शिक्षण, नागरी हवाई वाहतूक, आरोग्य सेवा, दंत वैद्यकीय, वैद्यकीय महाविद्यालय, खाण, कौशल्य विकास, पशुवैद्यकीय आदी खात्यांत ही भरती राजपत्रित अधिकारी पदासाठी होणार आहे. आयोगाने २३३ जागांसाठी जाहिराती देऊन अर्ज मागवले होते. त्यासाठी साडेसहा हजार जणांनी अर्ज केले होते. केवळ कनिष्ठ अधिकारी पदासाठी परीक्षा या खेपेला होणार नाही. त्या पदांसाठीची परीक्षा महाविद्यालये सुरु झाली की घेतली जाणार असल्याची माहिती त्यांनी दिली.

 

संपादन: ओंकार जोशी

संबंधित बातम्या