Goa Scam : मोठा घोटाळा उघड; गोव्यातील रेशनधान्याची कर्नाटकात विक्री; 6 जण गजाआड

गुप्त माहितीच्या आधारे अन्नपुरवठा खात्याच्या अधिकाऱ्यांनी छापा टाकत पणजी, सांगे आणि कुंडईतील गोदाम सील केली आहेत.
Ration Card Holders
Ration Card HoldersDainik Gomantak

Goa Scam : गोव्यात तूरडाळ आणि साखर घोटाळ्यानंतर आता आणखी एक मोठा घोटाळा समोर आला आहे. गोवा अन्न पुरवठा खात्याच्या गोदामातून तांदूळ आणि गव्हाची चोरी केली जात असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणात आतापर्यंत पोलिसांनी 6 जणांना ताब्यात घेतलं असून मुख्य सूत्रधार मात्र फरार होण्यात यशस्वी झाला आहे.

गोव्यात नुकत्याच गाजलेल्या तूरडाळ आणि साखर घोटाळ्यानंतर गोव्यात तांदुळ आणि गव्हाचा घोटाळा झाला आहे. राज्यात रेशनदुकानांवर वितरणासाठी आलेल्या धान्याची शेजारच्या कर्नाटक राज्यात नेऊन विक्री होत असल्याचं तपासातून स्पष्ट झालं आहे. आतापर्यंत किती धान्य गोव्यातून बाहेरच्या राज्यात नेण्यात आलंय याची ठोस आकडेवारी मिळाली नसली तरी या गोदामातून जवळपास 22 टन तांदूळ आणि गहू जप्त करण्यात आले आहेत.

Ration Card Holders
Goa Congress : पक्षाला उभारी देण्यासाठी गोव्यात काँग्रेसने कंबर कसली, घेतला मोठा निर्णय

गुप्त माहितीच्या आधारे अन्नपुरवठा खात्याच्या अधिकाऱ्यांनी छापा टाकत पणजी, सांगे आणि कुंडईतील गोदाम सील केली आहेत. इतकंच नाही तर ट्रक आणि मालवाहू रिक्षाही पोलिसांनी जप्त केली आहे. आतापर्यंत सहा जणांना पकडण्यात पोलिसांना यश आलं असून तब्बल 722 टन धान्य जप्त करण्यात आलं आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com