Grains Scam in Goa : क्राईम ब्रँचचा कारवाईचा धडाका सुरुच; फोंड्यासह कुठ्ठाळ्ळीत गोदामांची झडती

पोलिसांनी अटक केलेल्या सशयितांकडून बरीच माहिती मिळवून गोदामांतील व्यवहाराची झडती सुरू केल्याने सर्व काही आलबेल म्हणणाऱ्या काही अधिकाऱ्यांचेही धाबे दणाणले आहे.
Grains Scam in Goa
Grains Scam in GoaDainik Gomantak

Grains Scam in Goa : क्राईम ब्रँचने राज्यातील धान्यसाठा काळाबाजाराचा पर्दाफाश केल्यानंतरही नागरी पुरवठा खात्याने जप्त केलेला मालाशी काहीच संबंध नसल्याची ठाम भूमिका घेत हात झटकले आहेत. पोलिसही आता हा जप्त केलेला माल सरकारी गोदामामधीलच असल्याचा पुरावा जमा करण्यामागे लागले आहेत.

बेतोडा - फोंडा तसेच कुठ्ठाळ्ळी येथील नागरी पुरवठा खात्याच्या गोदामातील धान्यसाठ्याची तपासणी करताना लेखाजोखा आणि तेथील कर्मचाऱ्यांची कसून चौकशी सुरू केली आहे. पोलिसांनी अटक केलेल्या सशयितांकडून बरीच माहिती मिळवून गोदामांतील व्यवहाराची झडती सुरू केल्याने सर्व काही आलबेल म्हणणाऱ्या काही अधिकाऱ्यांचेही धाबे दणाणले आहे.`

पोलिसांच्या तपासानुसार जप्त करण्यात आलेल्या तांदळाच्या आणि गहूच्या काही पोती पणजी, सांगे, बेतोडा आणि कुठ्ठाळ्ळी येथील सरकारी गोदामातून गायब करून ती खासगी ट्रकातून कर्नाटकला पाठवण्यात येणार होती. सोमवारी रात्रभर तिन्ही ठिकाणी घातलेल्या छाप्यात तीन वेगवेगळे गुन्हे दाखल केले असले तरी संशयित सचिन नाईक बोरकर हाच या रॅकेटचा मुख्य सूत्रधार आहे हे अटक केलेल्या संशयितांनीच जबानीत सांगितले आहे. बोरकर याच्या अटकपूर्व जामिनाला विरोध करण्यासाठी ठोस माहिती मिळवण्यासाठी क्राईम ब्रँचने बेतोडा - फोंडा येथील सरकारी गोदामाची पोती ठेवण्याची क्षमता, खात्याच्या स्वस्त धान्य दुकानधारकांना धान्यसाठा वितरणासाठी वापरली जाणारी नोंदवही तसेच सर्व स्वस्त धान्य दुकानामध्ये धान्यसाठा वितरणासाठी बायमोमेट्रीक चाचणी ही सक्तीची आहे.

Grains Scam in Goa
Portuguese Order in Goa : गोव्यात लग्नसमारंभांवर प्रतिबंध आणणारा 1736 चा आदेश माहित आहे का?

या दुकांनाना त्यांच्याकडे नोंद असलेल्या रेशनकार्डनुसार दर महिन्याला धान्यसाठा देण्यात येतो. त्यानंतर धान्यसाठा वितरणाचा हिशोब घेतला जाऊन बायोमेट्रीक मशिनवरील माहितीशी जुळवाजुळव केली जाते. गोदामात आलेल्या व वितरणाच्या धान्यसाठ्याची नोंदणी केली जाते. त्यामुळे या धान्यसाठ्याच्या गोदामातून काळाबाजार होण्याची शक्यता खूपच कमी आहे. बायोमेट्रीक चाचणी लागू करण्यात आल्यापासून अशा प्रकारच्या काळाबाजार प्रकरणाला आळा बसला आहे मात्र सर्वच बंद झाला असे म्हणता येणार नाही. खात्याच्या काही निरीक्षकांचे स्वस्त धान्य दुकानदारांशी तपासणीच्या नावाखाली चांगले संंबंध निर्माण होऊन येथूनच भ्रष्टाचाराची कीड सुरू होते.

कारवाई राजकीप्रेरित असल्याचा सचिन बोरकरचा अर्जात दावा

दरम्यान, मुख्य सूत्रधार असलेल्या संशयित सचिन नाईक बोरकर याने अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला आहे. पोलिसांनी केलेली कारवाई ही राजकीयप्रेरित असून माझी प्रतिमा मलीन करण्याचा हा डाव आहे. जो काही गुन्हा नोंदवण्यात आला आहे त्याच्याशी काहीही संबंध नाही. न्यायालयाने अटकपूर्व जामीन मंजूर करताना ज्या काही अटी घातल्या जातील त्या मान्य असतील, असे अर्जात बोरकर याने म्हटले आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com