Goa News: पैंगीणच्या ग्रामसभेत डिपीआर रद्द करण्यासंबंधीचा ठराव मंजूर

पैंगीण पंचायतीच्या रविवार, 5 रोजी झालेल्या ग्रामसभेत म्हादई नदीचे पाणी वळविण्यास केंद्राने कर्नाटकला दिलेला डिपीआर रद्द करण्यासंबंधीचा ठराव मंजूर करण्यात आला.
Poinguinim Panchayat
Poinguinim PanchayatDainik Gomantak

Goa News: पैंगीण पंचायतीच्या रविवार, 5 रोजी झालेल्या ग्रामसभेत म्हादई नदीचे पाणी वळविण्यास केंद्राने कर्नाटकला दिलेला डिपीआर रद्द करण्यासंबंधीचा ठराव मंजूर करण्यात आला. यासंबंधीचा ठराव प्रदीप मोखर्डकर यांनी मांडला. त्या ठरावाला सेबी बार्रेटो यांनी अनुमोदन दिले.

यावेळी ग्रामसभेत पंचायतीने परप्रांतीय जमीनदारांना बांधकाम व अन्य परवाने देताना ग्रामसभेची मान्यता घेण्याचा ठराव मंजूर केला होता. त्या ठरावाची पायमल्ली करून गालजीबाग व अन्य भागांत बांधकाम व अन्य परवाने देण्यात आले आहेत.

त्यासंबंधी सेबी बार्रेटो यांनी प्रश्न उपस्थित केला. त्यावेळी सरपंच सविता तवडकर यांनी पूर्ण चौकशी करून मागील पंचायत मंडळाने दिलेले परवाने मागे घेण्यात येणार असल्याचे आश्वासन ग्रामसभेला दिले.

ग्रामसभेला सर्व नऊही पंच उपस्थित होते. पंचायत सचिव राजीव नाईक गावकर यांनी अंदाजपत्रकाचा तपशील वाचून दाखविला. त्या अंदाजपत्रकाला ग्रामसभेने मान्यता दिली.

Poinguinim Panchayat
Goa News: पाटो परिसरातील सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पाचे लोकार्पण

योग्य उपाययोजना करणार

यावेळी पंचायत क्षेत्रातील तळ्याचा विकास करण्याची मागणी करण्यात आली. गालजीबाग व तळपण किनाऱ्यावर बेकायदा पर्यटन व्यवसाय चालू आहे. काही घरे भाडेपट्टीवर परदेशी पर्यटकांना देण्यात येतात.

मात्र, त्यातून पंचायतीला महसूल प्राप्ती होत नाही, त्यासाठी पंचायतीने अशा व्यवसायांचे सर्वेक्षण करण्याची मागणी करण्यात आली. अशा व्यवसायांसंबंधी योग्य उपाययोजना करणार असल्याचे पंच सतीश पैंगीणकर यांनी सांगितले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com