Goa News : सांकवाळची ग्रामसभा राहिली अर्धवट

गोंधळाचे वातावरण : सरपंच, पंचायत सचिव, गटविकास अधिकारी, निरीक्षक गेले निघून
Goa News
Goa NewsGomantak Digital Team

सांकवाळ पंचायतीची ग्रामसभा रविवार, 21 रोजी सकाळी 9.15 वाजता बोलावण्यात आली होती; पण गणपूर्तीअभावी ती अर्ध्या तासाने उशिरा सुरू करण्यात आली. यावेळी पंचायत सचिव ओरविल वालीस यांनी गत ग्रामसभेचा अहवाल सादर करून दिल्यानंतर मान्यता देण्यात येण्यापूर्वीच कचरा शुल्क विषयावर चर्चा सुरू होताच बराच गोंधळ निर्माण होऊ लागला.

याच संधीचा फायदा घेऊन कार्यकारी सरपंच गिरीश पिल्लई ग्रामसभा अर्धवट सोडून देऊन निघून गेले. त्यांच्या मागोमाग पंचायत सचिव ओरविल वालीस, गटविकास अधिकारी, निरीक्षकही निघून गेल्याने सांकवाळ ग्रामसभा अपूर्ण होऊ शकली नाही.

यावेळी कचरा शुल्क परस्पर गोळा करणारा सुपरवायझर भरमसाट शुल्क गोळा करून ग्रामस्थांची पिळवणूक करीत असून हा प्रकार ताबडतोब बंद व्हायला पाहिजे, अशी मागणी पंच तुळशीदास नाईक यांनी केली. यावेळी त्यांच्यात व सुपरवायझर नारायण नाईक यांच्यात शाब्दिक चकमक झाली. यावेळी उपस्थित ग्रामस्थांकडून या शुल्काविरुद्ध जोरदार आवाज उठविण्यात आला.

Goa News
World Turtle Day 2023 : आगोंद किनारा गजबजलेलाच, तरीही कासवांचे आगमन

सरपंचांच्या कृतीचा निषेध

या गडबडीत सरपंच गिरीश पिल्लई फाईल टेबलवर ठेवून सभा अर्धवट सोडून निघून गेले. ग्रामसभेत उपस्थित असलेल्या सदस्यांना हा प्रकार आवडला नसल्याने सर्वांनी नाराजी व्यक्त करून याविरुद्ध रितसर तक्रार करण्याचा निर्णय घेण्यात आला. याबाबत पंचायत संचालक, पंचायतमंत्री, मुख्यमंत्री यांना तक्रारीची प्रत पाठविण्यासाठी सर्व उपस्थित सदस्यांनी आपल्या सहीनिशी या एकूण प्रकाराविरुद्ध निषेध नोंदविला.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com