‘संगीत कैकेयी’ नाटकाचे संस्मरणीय सादरीकरण

प्रेक्षकांकडून कौतूक : आमोणेतील श्री कुलपुरुषेश्‍वर देवाचा वर्धापनदिन सोहळा उत्साहात
Aamona Anniversary celebration
Aamona Anniversary celebrationDainik Gomantak

आमोणे : येथील भगत व आमोणकर कुळाव्याचे कुलदैवत श्री कुलपुरुषेश्‍वर या देवाच्या वर्धापनदिन मंगळवारी उत्साहात साजरा झाला. यानिमित्त संगीत पौराणिक कैकेयी या नाट्यप्रयोगाला प्रेक्षकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत कौतूक केले. तत्पूर्वी सकाळी विविध विधी यजमान विठ्ठल व सौ. विमल भगत यांच्याहस्ते पार पडल्या. यानंतर आरती, सामूहिक गाऱ्हाणे, तीर्थप्रसाद व महाप्रसादाचा कार्यक्रम झाला. यावेळी भाविक मोठ्या संख्यने उपस्थित होते.

वर्धापनदिन उत्सवानिमित्त रात्री आठ वाजता मंदिरापुढील मंडपात श्री कुलपुरुष समिती आयोजित व श्री रवळनाथ, महालक्ष्मी, कुलपुरुष महिला गटातर्फे संगीत पौराणिक कैकेयी या नाटकाचे आयोजन करण्यात आले होते. नाटकातील प्रमुख भूमिका असलेल्या कैकयी म्हणजेच सुनिता भगत हिने आपल्या भाषणाने व गायनाने रसिकांना मंत्रमुग्ध केले.

Aamona Anniversary celebration
Canada Hindu Temple Vandalised: कॅनडात पुन्हा एकदा हिंदू मंदिराची तोडफोड, भिंतींवर लिहिल्या भारतविरोधी घोषणा!

रामच्या पात्रातील नियती सावंत, सीता साकारणारी देवश्री भगत यांनीही शेवटपर्यत प्रेक्षकांना खूर्चीवर खिळवून ठेवले. नाटकास शिवनाथ नाईक यांचे दिग्दर्शन, ऑर्गन-कमलाकांत गावस, तबला- जानू शिखलकर, ध्वनी संयोजन- नरेश नाईक, सहदिग्दर्शक नारायण गोवेकर, नैपथ्य श्री गुरूदास प्रसाद रंगमंच (कासरपाल) यांचीही उत्तम साथ लाभली.

Aamona Anniversary celebration
Tambdi Surla Mahadev Temple: नुकसान करताहेत माकडं मात्र भुर्दंड सोसताहेत गाडेधारक... नेमका काय प्रकार?

यांनी साकारल्या भूमिका

नाट्यप्रयोगाच्या पात्रात दशरथ-स्नेहा भगत, विश्‍वमित्र-अमिता भगत, भरत-लेखिता रायकर, लक्ष्मण-साची भगत, शत्रुघ्न-शरण्या भगत, रावण - समृद्धी भगत, मंथरा-दीपल भगत, दासी-कनका नार्वेकर, किरात 1- माधुरी भगत, किरात 2- संपदा भगत, मुलगी श्रीनीका भगत, भिल्ल-धनश्री भगत, विष्णू 1-सुवर्षा भगत, विष्णू 2- सुष्मिता भगत व विदूषक/मारुती-संतोषी आमोणकर यांनीही आपल्या भूमिकेतून रसिकांची वाहवा मिळविली.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com