गोवा मुक्ती संग्रामाचे प्रणेते राम मनोहर लोहिया यांना मानवंदना

गोमन्तक वृत्तसेवा
मंगळवार, 23 मार्च 2021

गोवा मुक्ती संग्रामाचे प्रणेते डाॅ. राम मनोहर लोहिया यांच्या 111 व्या जयंतीदिनी उपमुख्यमंत्री बाबू कवळेकर यांनी लोहिया यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून त्यांना मानवंदना दिली. 

मडगाव ः गोवा मुक्ती संग्रामाचे प्रणेते डाॅ. राम मनोहर लोहिया यांच्या 111 व्या जयंतीदिनी उपमुख्यमंत्री बाबू कवळेकर यांनी लोहिया यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून त्यांना मानवंदना दिली. (The great socialist leader Dr Ram Manohar Lohia was the founder of the Goa liberation struggle)

यावेळी स्वातंत्र्य सैनिक वामन प्रभुगावकर, गोपाळ चितारी,  मडगाव रविंद्र भवनचे अध्यक्ष दामू नाईक, 18 जून क्रांती दिन समितीचे अध्यक्ष अविनाश शिरोडकर, माहिती व प्रसिद्धी खात्याचे सहसंचालक रमेश नाईक, पराग गजानन रायकर, मनोहर बोरकर उपस्थित होते.

दुबईहून गोव्यात आलेल्या प्रवाशाकडून 17.39 लाखांचे सोने जप्त 

थोर समाजवादी नेते डाॅ. राम मनोहर लोहिया हे गोवा मुक्ती संग्रामाचे प्रणेते होते. त्यांच्या जीवन कार्याला उजाळा मिळावा व नवीन पिढीला त्यांच्या कार्याचे महत्व कळावे यासाठी सरकारने यंदा गोवा मुक्तीच्या षष्ठ्यब्दीचे औचित्य धरून लोहिया यांची जयंती राज्य स्तरावर साजरी कऱण्याचा निर्णय घेतला असे कवळेकर यांनी यावेळी सांगितले. प्रसिद्धी व माहिती खात्याने या कार्यक्रमाचे आयोजन केले.   

वाहतूक मंत्री गुदिन्हो यांच्या हस्ते विंटेज कार रॅलीचे उद्‌घाटन 

संबंधित बातम्या