‘आप’च्या ऑक्सिमित्र मोहिमेला नागरिकांचा मोठा पाठिंबा : म्हांबरे

गोमन्तक वृत्तसेवा
रविवार, 1 नोव्हेंबर 2020

एक सर्वसामान्य गोमंतकीय कोविडबद्दल काहीच माहिती नसल्याने पूर्णपणे अनभिज्ञ होता. कारण सरकारकडून काहीही माहिती दिली गेली नाही. ज्यामुळे सर्वसामान्य गोवेकर महामारीला तोंड देण्यास अजिबात तयार नव्हता आणि त्यामुळे त्याला आपण कुठेतरी हरवलोय असे वाटत होते. त्यामुळे आम आदमी पक्षाच्या ऑक्सिमित्र मोहिमेला त्यांनी भरभरून पाठिंबा दिला अशी माहिती आम आदमी पक्षाचे प्रभारी निमंत्रक राहुल म्हांबरे यांनी दिली.

पणजी :  एक सर्वसामान्य गोमंतकीय कोविडबद्दल काहीच माहिती नसल्याने पूर्णपणे अनभिज्ञ होता. कारण सरकारकडून काहीही माहिती दिली गेली नाही. ज्यामुळे सर्वसामान्य गोवेकर महामारीला तोंड देण्यास अजिबात तयार नव्हता आणि त्यामुळे त्याला आपण कुठेतरी हरवलोय असे वाटत होते. त्यामुळे आम आदमी पक्षाच्या ऑक्सिमित्र मोहिमेला त्यांनी भरभरून पाठिंबा दिला अशी माहिती आम आदमी पक्षाचे प्रभारी निमंत्रक राहुल म्हांबरे यांनी दिली.

 पत्रकार परिषदेत ते म्हणाले, गोमंतकीयांसाठी टाळेबंदीचा काळ बराच कठीण होता. कारण या काळात एकमेकांच्या संपर्कात येण्यावर बंदी होती. लोकांना मिळणाऱ्या वैद्यकीय सुविधांचीही मारामार होती. कारण कोविडच्या रुग्णांना गोमेकॉच्या फरशीवर झोपायची पाळी आली आणि ईएसआय इस्पितळात आवश्यक प्रमाणात खाटाच नसल्याने रुग्णांना माघारी पाठवण्याचे प्रकार घडले. एका वेळेला भाजप सरकार लोकांना अतिआवश्यक अशा पायाभूत सुविधा व सेवा देण्यास सर्वार्थाने कमी पडत असताना आम आदमी पक्षाने ‘ऑक्सिमित्र’ मोहिमेची सुरवात केली. ज्यामुळे लोकांना त्यांच्या प्राणवायू अथवा ऑक्सिजन स्तराची खात्रीशीर माहिती व तपशील मिळू लागला.

आम्हाला कळविण्यास आनंद होत आहे की आम आदमी पक्षाची ‘ऑक्सिमित्र’ अथवा ‘ऑक्सिमीटर मोहीम’ ९ सप्टेंबर रोजी प्रारंभ करण्यात आली आणि अतिशय यशस्वी ठरली. कारण आतापर्यंत २ लाख घरांमध्ये ही मोहीम राबविण्यात आली आहे. त्याशिवाय गरज आहे अशांना ५०० ऑक्सिमीटर दान केले. लोकांमध्ये आम आदमी पक्षही लोकप्रिय झाला. उदाहरण द्यायचे झाले तर पर्रा येथील लोकांनी मायकल लोबो यांच्या पत्नीला निक्षून सांगितले की भाजप काहीही करत नाही आणि आता आम आदमी पक्ष लोकांना मदत करण्यासाठी पुढे सरसावला असताना त्यांना रोखण्यासाठी अडवणूक करण्याचे काम करीत आहे.
 

संबंधित बातम्या