अमेरिकास्थित गोमंतकीय डॉक्टरांकडून गोव्याला 14 ऑक्सिजन कॉन्स्टेटर

अमेरिकास्थित गोमंतकीय डॉक्टरांकडून गोव्याला 14 ऑक्सिजन कॉन्स्टेटर
Group of Goan Doctors

पणजी: गोवा वैद्यकीय महाविद्यालय(GMC) बांबोळी(Bambolim) येथे 1972 च्या बॅचमध्ये शिकलेले व सध्या अमेरिका(America) येथे राहणाऱ्या गोमंतकीय डॉक्टरांनी(Doctor) गोव्यातील कोरोना(Goa Covid Update) रुग्णांसाठी 14 ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर पाठवले आहेत. इंडियन मेडिकल असोसिएशन गोवाचे अध्यक्ष डॉ. विनायक बुवाजी यांनी दिलेल्या माहितीनुसार, गोमेकॉच्या 1972 च्या बॅचचे डॉ. कृष्णकांत रायकर, डॉ. दीपक कामत, डॉ. नेल्सन डिसिल्वा,  डॉ. सुरेश डिमेलो, डॉ. ग्लेनीज वाशी व डॉ. ज्योती वालावलकर आणि त्यांच्या मित्रांनी मिळून गोव्यासाठी 14 ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर पाठवले आहेत.(Group of Goan Doctors in America 14 Oxygen concentrator aid)

‘आयएमए’ गोवातर्फे हे 14 ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर गोव्यातील आयएमएच्या सात शाखांकडे प्रत्येकी दोन याप्रमाणे सुपूर्द करण्यात येतील. त्यानंतर त्या-त्या शाखेतर्फे त्या परिसरातील कोरोना उपचार केंद्रात व स्टेपअप इस्पितळात कोरोना रुग्णांसाठी दिले जातील, असे डॉ. विनायक बुवाजी यांनी सांगितले. या ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर एक उपकरण डिचोली  केशव सेवा साधना हायस्कूलमध्ये स्टेपअप इस्पितळात बसवण्यात आला आहे. आयएमए डिचोली अध्यक्ष व आरोग्य केंद्राच्या अधिकारी डॉ. मेधा साळकर यांच्या उपस्थितीत हा ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर येथे बसवला. यावेळी डॉ. शेखर साळकर उपस्थित होते. 

दरम्यान राज्यात पहिला व दुसरा लसीकरणाचा डोस घेतलेल्या 45 वर्षांवरील व्यक्तींची संख्या 5 लाखांवर पोहचली आहे. काल दिवसभरात इस्पितळे व आरोग्य केंद्र येथे 2900 जणांनी तर 36 टिका उत्सव केंद्राच्या मोहिमेद्वारे 2459 जणांनी लसीकरण करून घेतले. आतापर्यंत पहिला लसीचा डोस घेतल्यांची संख्या 3 लाख 12 हजार 532 वर तर दोन्ही डोस घेतल्यांची संख्या 95 हजार 968 वर पोहचली आहे. राज्याला 7 लाख 31 हजार 720 लसीचे डोस केंद्राकडून मिळाले आहेत. त्यापैकी 2 लाख 60 हजार लसीचे डोस शिल्लक आहेत. 18 ते 45 वर्षाखालील 32 हजार 879 जणांना डोस देण्यात आला आहे तर 6360 डोस शिल्लक आहेत.

No stories found.
Dainik Gomantak
www.dainikgomantak.com