म्हापश्यात मासळी विक्रेत्यांमध्ये कोरोनाची धास्ती

दैनिक गोमंतक
सोमवार, 3 मे 2021

सरकारने जारी केलेल्या टाळेबंदीमुळे गेल्या तीन दिवसांपासून गोव्यातील बाजारपेठा तसेच तेथील मासळीविक्रीही पूर्णत: बंदच आहे.

म्हापसा : गोवा राज्यात कोविडची रुग्णसंख्या तसेच मृतांची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्याने आता शहरी तसेच ग्रामीण भागांतील लोकांनी फिरत्या मासळी विक्रेत्यांचीही धास्ती घेतली आहे. कित्येक मासळी विक्रेते बार्देश तालुक्यातील शहरी तसेच ग्रामीण भागांत फिरत आहेत; तथापि, कोविडच्या भीतीने लोक त्या विक्रेत्यांसमोर जाण्याचेच टाळत आहेत.
सरकारने जारी केलेल्या टाळेबंदीमुळे गेल्या तीन दिवसांपासून गोव्यातील बाजारपेठा तसेच तेथील मासळीविक्रीही पूर्णत: बंदच आहे. काही मासळीविक्रेते सायकलवरून, स्वयंचलित दुचाकीवरून तसेच काही महिला पायी चालत जाऊन ठिकठिकाणी मासळीविक्री करीत आहेत. तथापि, त्यांना पुरसे गिऱ्हाईक प्राप्त होत नाही, असे आढळून आले आहे. त्यामुळे अशा व्यवसायिकांना सध्या आर्थिक नुकसान होत आहे. (The growing contagion of corona has caused panic among fishmongers in Mhapusa ) 

Goa Lockdown: कदंब बससेवा, मासळी मार्केट सात ते सात सुरू

लोकांमध्ये पसरलेल्या कोविडच्या भीतीमुळे फिरत्या मासळीविक्रेत्यांचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाले आहे. अवघेच लोक अशा विक्रेत्यांकडून मासळी विकत घेत असतात. मासळीसाठी आता मागणी कमी असल्याने माशांचे दरही नेहमीपेक्षा किंचित कमी झालेले आहेत. टाळेबंदीमुळे मासळीला मागणी कमी असेल या कारणास्तव बहुतांश मच्छीमारांनीही स्वत:चा व्यवसाय सध्या बंदच ठेवलेला आहे. बहुतांश गोमंतकीय लोक मत्स्यप्रेमी असले तरी कोविडचा धसका घेऊन सध्या विक्रेत्यांकडून मासळी विकत न घेण्याचा बहुतांश गोमंतकीयांचा कल आहे.

संबंधित बातम्या