गोव्यातील जलसफरी बोटींवर वाढतेय गर्दी

गोवा व्यावसायिकांमध्ये उत्साह : आता प्रतीक्षा चार्टर विमानांची
गोव्यातील जलसफरी बोटींवर वाढतेय गर्दी
गोव्यातील जलसफरी बोटींवर वाढतेय गर्दीDainik Gomantak

पणजी: राज्यातील (State) किनाऱ्यांवरील शॅक्‍सव्यवसाय सुरू झाला असून आता प्रतीक्षा आहे ती विदेशी पर्यटकांची. देशी पर्यटकांची गेल्या महिन्यापासूनच वर्दळ सुरू झाली आहे. त्यामुळे गेले वर्ष कोरोना महामारीमुळे कोलमडलेला हा व्यवसाय यावर्षी वेळेवर सुरू झाल्याने व्यावसायिकांमध्ये उत्साह पसरला आहे.

गोव्यातील जलसफरी बोटींवर वाढतेय गर्दी
सरकार तुमच्या दारी उपक्रमाचे गरीबांकडे दुर्लक्ष; प्रवीण आर्लेकर

पर्यटन खात्याकडून तीन वर्षांसाठी मिळालेल्या शॅक्स व्यवसायाचे यंदा हे तिसरे वर्ष आहे. आता अधिकाधिक उलाढाल होण्याची व चार्टर विमानांची प्रतीक्षा व्‍यावसायिकांना आहे. शॅक्‍समालक संघटनेचे अध्यक्ष क्रुझ कार्दोज यांनी सांगितले की, 2019-22 या तीन वर्षांसाठी शॅक्‍सचे वितरण करण्यात आले, मात्र 2019 साली पर्यटन मोसम सुरू होऊन तीन महिने झाले अन् जगभरात कोरोना संसर्गाची लाट आली. या लाटेमुळे या व्यवसायावर मोठा आघात झाला. वर्षासाठीसाठीची परवाना शुल्कसाठी जमा केलेली रक्कमही झालेल्या व्यवसायातून वसुल झाली नाही. त्यानंतर हा व्यवसाय बंदच झाला, तो आता गेल्या महिन्यापासून सुरू झाला आहे.

गोव्यातील जलसफरी बोटींवर वाढतेय गर्दी
पेडणे तालुक्यातील युवा शेतकऱ्यांचे नवनविन प्रयोग

राज्यात सुमारे 35 हून अधिक समुद्रकिनारी 355 शॅक्‍सना परवानगी देण्यात आलेली आहे. त्यांपैकी दक्षिण गोव्यात 105 तर उत्तर गोव्यात 250 शॅक्‍स आहेत. गेल्या महिन्यापासून शॅक्‍समालकांनी किनाऱ्यावर शॅक्‍सचे बांधकाम करण्यास सुरुवात केली होती. त्यामुळे काहींचा व्यवसाय सुरू झाला तर काहीजणांचे शॅक्‍स बांधण्याचे काम सुरू आहे. देशी पर्यटक मोठ्या प्रमाणात येऊ लागल्याने या व्यवसायाला गती मिळू लागली आहे. कळंगुट, बागा, हणजूण व हरमल या भागात पर्यटकांची दिवसेंदिवस गर्दी वाढत आहे ही चांगली बाब आहे असे क्रुझ म्हणाले.

गोव्यातील जलसफरी बोटींवर वाढतेय गर्दी
गोवा मुक्तीची प्रेरकशक्ती, थोर समाजवादी: डॉ. राममनोहर लोहिया

तीन वर्षांसाठी करार केलेल्या शॅक्‍स व्यवसायाच्या काळापैकी दीड वर्ष कोरोना संसर्गामुळे वाया गेल्याने त्याचा फटका व्यावसायिकांना बसला. त्यामुळे सरकारने शॅक व्यवसायातील परवाना शुल्कातील 50 टक्के रक्कम माफ करण्याची विनंती मंजूर केल्याने मोठा दिलासा मिळाला आहे. या व्यवसायात गेले दीड वर्ष झालेला तोटा भरून काढणे शक्य नसले तरी निदान शेवटच्या वर्षात तरी हा व्यवसाय सुरू झालाय ही समाधानाची बाब आहे. येत्या 15 ऑक्टोबरपासून केंद्र सरकारने देशात चार्टर विमानांना हिरवा कंदील दाखविला आहे. त्यामुळे विदेशी पर्यटक गोव्यात दाखल होणार आहे. हे पर्यटक किनारी भागातील शॅक्‍सना आवर्जून भेट देतात. साहजिकच विदेशी पर्यटकांची संख्या या पर्यटन मोसमात वाढून त्याचा फायदा शॅकमालकांना होणार आहेच, शिवाय सरकारच्याही महसुलात वाढ होणार आहे असे क्रुझ म्हणाले.

गोव्यातील जलसफरी बोटींवर वाढतेय गर्दी
माजी गोवा राज्यपाल 'सत्यपाल मलिक' यांची मुख्यमंत्र्यांच्या विरोधात भूमिका

जलसफरी बोटींवर गर्दी वाढतेय

राज्यातील कॅसिनो, शॅक्‍स, बार अ‍ॅण्‍ड रेस्टॉरंटस्‌ तसेच जलसफरी बोटींना कोरोना मार्गदर्शक सूचनांचे (एसओपी) पालन करण्याच्या अटी घालून परवानगी दिली गेल्याने देशी पर्यटकांची वर्दळ वाढली आहे. पणजी शहरात संध्याकाळी सहानंतर कॅसिनो तसेच जलसफरी बोटींच्या प्रवेशासाठी पर्यटकांची मोठी गर्दी दिसून येत आहे. एकीकडे कोरोना संसर्गाची लाट संपलेली नसताना हे पर्यटक मोठ्या प्रमाणात गर्दी करत असल्याने ‘एसओपी’चे तीन तेरा वाजले आहेत. यावर नियंत्रण ठेवण्यासाठी सरकारी यंत्रणा अपयशी ठरली आहे, हेसुद्धा तेवढेच खरे.

15 ऑक्टोबरपासून केंद्र सरकारने देशात चार्टर विमानांना हिरवा कंदील दाखविला आहे. त्यामुळे विदेशी पर्यटक गोव्यात दाखल होणार आहेत. हे पर्यटक किनारी भागातील शॅक्‍सना आवर्जून भेट देतात. साहजिकच विदेशी पर्यटकांची संख्या या पर्यटन मोसमात वाढून त्याचा फायदा शॅकमालकांना होणार आहेच, शिवाय सरकारच्याही महसुलात वाढ होणार आहे.

- क्रुझ कार्दोज, शॅक्‍समालक संघटनेचे अध्यक्ष

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak
www.dainikgomantak.com