South Goaत वाढतेय देशी पर्यटकांची संख्या

नववर्षाला पर्यटकांची गर्दी दिसून आली
South Goaत वाढतेय देशी पर्यटकांची संख्या
Growing domestic tourists in South Goa Dainik Gomantak

सासष्टी: राज्यात (Goa) कोरोना विषाणूची (Covid-19) स्थिती सध्या नियंत्रणात येऊ लागल्याने गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा दक्षिण गोव्यात (South Goa) पर्यटकांची (Tourist) संख्या वाढताना दिसत आहे. गतवर्षी पर्यटन हंगामाच्या सुरवातीला मोठ्या प्रमाणात पर्यटक गोव्यात आले होते. पण, नंतर कोरोनाची दुसरी लाट सुरू झाल्याने पर्यटकांची संख्या घटली. आता ऑगस्ट महिन्यापासून गोव्यात देशी पर्यटक पुन्हा वाढत असून, येणाऱ्या दिवासात ही संख्या आणखीन वाढण्याची शक्यता आहे.

दिवाळीत दक्षिण गोव्यात येणाऱ्या पर्यटकांची संख्या काही प्रमाणात वाढली होती, तर ख्रिसमस तसेच नववर्षाला पर्यटकांची गर्दी दिसून आली होती. पण, नंतर कोरोनाच्या पहिल्या लाटेपेक्षा अधिक विध्वसंक बनलेल्या दुसऱ्या लाटेमुळे दक्षिण गोव्याबरोबर गोव्यातही येणाऱ्या पर्यटकांची संख्या कमी झाली होती.

यंदा जुलै महिन्यापासून कोरोनाची स्थिती नियंत्रणात येऊ लागल्याने दक्षिण गोव्यात येणाऱ्या पर्यटकांची संख्या वाढत आहे, असे गोवा शॅकमालक कल्याण सोसायटीचे अध्यक्ष क्रुझ कार्दोझ यांनी सांगितले.

Growing domestic tourists in South Goa
Goa Ganesh Chaturthi 2021: गणेशोत्सव SOPचा 'तो' आदेश तात्काळ मागे

मार्च महिन्यात गोव्यात कोरोना विषाणूचा प्रचार वेगाने सुरू होता तर कोरोनामुळे होणाऱ्या मृत्यूसंख्याही वाढत होती. या विषाणूमुळे राज्यातील उद्योग व्यवसाय पुन्हा धोक्यात आले होते, तर याचा सर्वाधिक फटका पर्यटन व्यवसायाला बसला होता.

कोरोनाचा भीतीने दक्षिण गोव्यातील 40 टक्केच शॅक सुरू केले होती. पण, कोरोनाने पुन्हा थैमान घातल्याने दक्षिण गोव्यातील शॅकमालकांनी सर्व शॅक बंद केले. आता कोरोनाची स्थिती नियंत्रणात आली असून, देशी पर्यटक मोठ्या प्रमाणात गोव्यात येत आहेत, असे क्रुझ कार्दोझ म्हणाले.

Growing domestic tourists in South Goa
Goa Mining Ban: खाण कंपन्यांना ‘सर्वोच्च’ दणका

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak
www.dainikgomantak.com