गोवा विमानतळावर वाढतेय प्रवाशांची ‘लाट’!

कोरनाच्या दुसऱ्या लाटेनंतर एकाच दिवशी एवढ्या प्रमाणात झालेली प्रवाशांची ये-जा ही सर्वाधिक ठरल्याची माहिती गोवा विमानतळाचे संचालक गगन मलिक यांनी दै ‘गोमन्तक’ला दिली.
गोवा विमानतळावर वाढतेय प्रवाशांची ‘लाट’!
Growing passenger congestion at Goa airport Dainik Gomantak

पणजी: कोरोना महामारीचे संकट (Covid-19) अजूनही कायम आहे. नियमांचे पालन करून प्रवास करण्याचे आव्हान असताना ‘गगनभरारी’ साठी प्रवाशांची वाढणारी संख्या सकारात्मक संदेश देत आहे. रविवारी गोवा विमानतळावर (Goa Airport) तब्बल 20 हजार प्रवाशांनी ये-जा केली. दुसऱ्या लाटेनंतर एकाच दिवशी एवढ्या प्रमाणात झालेली प्रवाशांची ये-जा ही सर्वाधिक ठरल्याची माहिती गोवा विमानतळाचे संचालक गगन मलिक यांनी दै ‘गोमन्तक’ला दिली.

मलिक म्हणाले, गोव्यात सध्या कोरोनाबाधितांची संख्या नियंत्रणात आहे. त्यामुळे इतर राज्यांतील पर्यटकांना गोव्यात येण्याची उत्सुकता वाढली आहे. रोज पर्यटकांच्या संख्येत वाढ होत आहे. सध्या देशी विमानेच सुरू असल्याने ही संख्या मर्यादित असली तरी गेल्या दोन महिन्यांपासून या विमानांची संख्याही वाढली आहे. आता दिवसाला 65 विमाने गोव्यात येत आहेत. यापूर्वी जी 55 अशी होती. प्रवाशांच्या सुरक्षेची काळजी घेण्यासाठी विमानतळ प्राधिकरणही सर्वतोपरी प्रयत्न करीत आहे. प्रत्येक ठिकाणी सॅनिटायझर्स, तपासणी केंद्र, रोजची स्वच्छता यावर अधिक लक्ष दिले जात आहे. नियमांचेही काटेकोरपणे पालन केले जात आहे. त्यामुळे भविष्यात प्रवाशांची संख्या अधिक वाढेल, असा विश्वास आहे.

Growing passenger congestion at Goa airport
दक्षिण गोव्यातील बाणावली समुद्रात परप्रांतीय मच्छीमारांनी अवैधरित्या घुसखोरी

चार्टर्ड विमाने नोव्हेंबरमध्ये...

राज्यात सध्या देशी विमानांनाच परवानगी दिली गेली आहे. चार्टर्ड विमाने ऑक्टोबरमध्ये सुरू होण्यासाठी राज्य सरकारने प्रयत्न चालविले होते. मात्र चार्टर्ड विमाने ही नोव्हेंबरच्या दुसऱ्या आठवड्यात सुरू होण्याची शक्यता असल्याचे मलिक यांनी सांगितले. सध्या महाराष्ट्र, दिल्ली, गुजरात आणि राजस्थान येथून येणाऱ्या विमानांची संख्या जास्त आहे. विमानतळावरील ये-जा वाढली आहे. रविवारी 22 हजार प्रवाशांची ये-जा झाली ही दुसऱ्या लाटेनंतरची विक्रमी संख्या ठरली, असेही मलिक यांनी सांगितले.

Growing passenger congestion at Goa airport
पेडणे तालुक्यात राजकीय समीकरणांना वेग; गोवा फॉरवर्डला बसणार फटका

500 रुपये दंड...

दाबोळी विमानतळावर नियमांचे काटेकोरपणे पालन केले जात आहे. ज्या प्रवाशांनी मास्क वापरला नाही त्यांना 500 रुपयांचा दंड आकारण्यात येत आहे. तसेच ज्यांच्याकडे कोरोना निगेटिव्ह प्रमाणपत्र नाही किंवा आरटीपीसीआर चाचणी नाही अशा लोकांची तात्काळ सशुल्क चाचणी केली जात आहे. स्वातंत्र्याला 75 वर्षे पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर गोवा विमातळ विविध कार्यक्रम राबवित आहे. विमानतळावरील ‘आझादी का अमृत महोत्सव’ याचा संदेश देणारा हॉट बलून पर्यटकांना आकर्षित करीत असल्याचेही मलिक म्हणाले.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak
www.dainikgomantak.com