गोवा: अ‍ॅप आधारीत टॅक्सी सेवेला जीएसआयएचे समर्थन

दैनिक गोमंतक
बुधवार, 14 एप्रिल 2021

गोवा माईल्स  तर गोव्यात  कायम राहिलीच पाहिजे, पण त्याच बरोबर ओला, उबर आदी अ‍ॅपआधारीत टॅक्सी सेवांनाही सरकारने परवानगी द्यावी अशी मागणी संघटनेने केली आहे.

मडगाव: गोव्यातील लघु, मध्यम व सूक्ष्म उद्योगांची शिखर संघटना असलेल्या गोवा राज्य औद्योगिक संघटनेने (जीएसआयए) अ‍ॅप आधारीत टॅक्सी सेवेचे समर्थन केले आहे. गोवा माईल्स  तर गोव्यात  कायम राहिलीच पाहिजे, पण त्याच बरोबर ओला, उबर आदी अ‍ॅपआधारीत टॅक्सी सेवांनाही सरकारने परवानगी द्यावी अशी मागणी संघटनेने केली आहे. (GSIA support app based taxi service)

डिजिटल मीटर व टॅक्सी भाड्यांच्या दरावर नियंत्रण नसल्याने टॅक्सी चालक पर्यटक तसचे टॅक्सी सेवा घेणाऱ्या स्थानिकांकडूनही मन मानेल तसेच भाडे आकारतात. गोवा हे पर्यटकांचे आडते स्थळ आहे. पण, टॅक्सी चालकांच्या या वर्तणुकीमुळे गोवा राज्याची बदनामी होत आहे, असे संघटनेचे अध्यक्ष दामोदर कोचकर यांनी म्हटले आहे.

राज्यातील सर्व टॅक्सींना डिजिटल मीटर बसवण्याच्या सरकारच्या निर्णयाचे स्वागत असून सरकारच्या या निर्णयामुळे टॅक्सी सेवेत पारदर्शकता येईल व गोव्याची प्रतिमाही उजळ होईल, असे कोचकर यानी म्हटले आहे.

गोवाः चंद्रकांत कवळेकरांकडून उमेदवारांना भूखंडांची ‘ऑफर’

अ‍ॅप आधारीत टॅक्सी सेवा सर्वांसाठी सोयीस्कर आहे. टॅक्सी चालकांकडून जादा भाडे आकारण्यात आल्याच्या तक्रारी वेर्णा औद्योगिक वसाहतीत भेट देणारे पुरवठादार व क्लायंट सतत करत असतात. एखादा क्लायंट हाॅटेलात उतरला असल्यास त्याला आमच्या वाहनातून आणण्यासही टॅक्सी लाॅबीचा विरोध असतो. लोकशाही असलेल्या देशात असले प्रकार चालणार नाहीत. प्रवासासाठी कोणती सेवा घ्यायची याचा निर्णय घेण्याचा अधिकार प्रत्येक नागरिकाला असला पाहिजे, असे कोचकर यांनी म्हटले आहे. 

संबंधित बातम्या