राज्यात युवा नवनिर्माणासाठी 'जीएसआयएनसी'कडून योजना जाहीर

goa state innovation council
goa state innovation council

पणजी- गोवा राज्य नवनिर्मिती परिषदेने (गोवा स्टेट इनोव्हेशन कौन्सिल तथा जीएसआयएनसी) राज्यातील युवा नवनिर्माणासाठी नुकतीच एक योजना जाहीर केली आहे. त्यामुळे हे कौन्सिल संबंधित नवनिर्मातांकरिता नमुना तयार करण्यासाठी, तसेच पेटंट मिळविण्यासाठी आणि बौद्धिक अधिकार मिळवून देण्याकरिता सहकार्य करणार आहे.
या परिषदेचे अध्यक्ष जोस मॅन्युएल नरोन्हा यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत जीएसआयएनसीच्या सदस्यांनी हजेरी लावली आणि या योजनेला हिरवा कंदील मिळाला.

राज्यात अनेक तरुण नवनिर्माता आहेत. त्यात विद्यार्थी, अभियंता, स्टार्टअप्स, संशोधन क्षेत्र आणि उद्योजकांचा समावेश आहे. मशीन, गॅझेट किंवा उपकरणे तयार करण्याच्या नावीन्यपूर्ण कल्पना या नवनिर्मात्यांना ज्ञात आहेत. त्यामुळे या नव संशोधकांनी त्यांची कल्पना कागदावर ठेवली. परंतु त्यांच्याकडे प्रोटोटाइप किंवा त्यासाठीचे मॉडेल तयार करण्यासाठी लागणारी आर्थिक मदत मिळत नसल्याने त्यांच्या कल्पनांना वाव मिळत नाही आणि त्या मागे पडतात, असे परिषदेच्या अध्यक्षांचे म्हणणे आहे.  

परिषदेच्या नव्या योजनेअंतर्गत अर्जदार तात्पुरते पेटंट करिताचे अर्ज भरण्यासाठी दहा हजार रुपयांपर्यंतच्या मदतीस पात्र असेल. परिषदेच्या संकेतस्थळावर अस्तित्वात असलेल्या व्हर्च्युअल इनोव्हेशन रजिस्टरमध्ये नोंदणी केल्यानंतरच व्यक्ती जीएसआयएनसीकडे अर्ज करू शकतात, असेही अध्यक्ष नोरोन्हा यांनी नमूद केले. आम्हाला आशा आहे, की ही योजना केवळ राज्यातील तरुण नवनिर्मातांना मदत करणार नाही, तर राज्यात इतर क्षेत्रांतही पुढाकार घेईल.

व्हर्च्युअल इनोव्हेशन रजिस्टर हे नवनिर्मात्यांना आपल्याकडे ओढून घेण्यासाठी म्हणून कार्य करेल. त्याशिवाय संभाव्य खरेदीदारांशी थेट ते चर्चा करतील. विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागांतर्गत विद्यापीठ, महाविद्यालये, उच्च शिक्षण संस्था, मध्यम व लघु उद्योग, संशोधन व विकास उद्योगातील तरुण प्रतिभेस प्रोत्साहित करण्याच्यादृष्टीने जीएसआयएनसी काम करीत आहे. ही परिषद नाविन्यपूर्णतेची संधी शोधते, नाविन्यपूर्ण प्रतिभा ओळखते आणि यशोगाथा प्रसारित करते. डॉन बॉस्को कॉलेज ऑफ इंजिनीअरिंग येथे एक अद्ययावत प्रोटोटाइपिंग लॅबची स्थापना केली असून, जिथे राज्यातील युवा वर्ग आपल्या नव्या कल्पनांना वैज्ञानिकदृष्ट्या आकार देऊ शकतात.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com