GST: 'तामिळनाडूच्या अर्थमंत्र्यांकडून गोव्याचा अपमान'

minister.jpg
minister.jpg

नवी दिल्ली : जीएसटी (GST) नुकसान भरपाईसाठी केंद्र सरकारने छोट्या राज्यांना पसंती दिली परंतु तामिळनाडूच्या अर्थमंत्र्यांनी (Dr P Thiaga Rajan) या  प्रस्तावावर आक्षेप घेतला आणि ते म्हणाले की, "छोट्या राज्यांना कोणतेही महत्व दिले जाऊ नये." यावर "तामिळनाडूच्या अर्थमंत्र्यांनी असे म्हणून गोव्याचा अपमान केला आहे असे परिवहन मंत्री गुदिन्हो (Goodinho) म्हणाले.  "कोरोना निर्बंधामुळे, खाणकाम बंदिमुळे आणि पर्यटनातील घसरणीमुळे गोव्याच्या महसुलाला मोठा फटका बसला त्यामुळे जीएसटीचे दर कमी करावे," असे जीएसटी कौन्सिलमध्ये राज्याचे प्रतिनिधित्व करणारे परिवहन मंत्री गुदिन्हो म्हणाले. (GST Tamil Nadu finance minister Palanivel Thiagarajan insults Goa)

कोरोनावरील उपचारासाठीची औषधे, वैद्यकीय उपकरणे तसेच लस यावरील जीएसटी कपातीचा आढावा घेण्यासाठी नेमलेल्या आठ सदस्यीय मंत्रिगटात महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांचाही समावेश करण्यात आला आहे. मेघालयाचे मुख्यमंत्री कोनराड संगमा हे या मंत्रिगटाचे समन्वयक आहेत. वाहतूक मंत्री माविन गुदिन्हो हे मंत्रिगटातील सदस्य आहेत. 

जीएसटी परिषदेच्या काल झालेल्या 43 व्या बैठकीमध्ये कोरोनाप्रतिबंधक लस, औषधे, टेस्टिंग किट, वैद्यकीय ऑक्सिजन, ऑक्सिमीटर, हँड सॅनिटायजर, कॉन्सन्ट्रेटर, व्हेन्टिलेटर, ऑक्सिजन जनरेटर, पीपीई किट, एन-95 मास्क, सर्जिकल मास्क, तापमापक उपकरण यासारख्या कोरोनावरील उपचारसाहित्यावरील जीएसटी पूर्णपणे हटविण्याची आग्रही मागणी राज्यांची प्रामुख्याने कॉंग्रेस आणि अन्य विरोधी पक्षांची सत्ता असलेल्या राज्यांची होती. मात्र यावर केंद्र आणि राज्यांमध्ये सहमती होऊ शकली नाही. अखेर या उपकरणांवरील जीएसटीचे दर कमी करावे यावर एकमत झाल्यानंतर जीएसटी दराचा आढावा घेण्यासाठी मंत्रिगट नेमण्याचे ठरले.

त्यापार्श्वभूमीवर आज मंत्रिगटातील सदस्यांची नावे जाहीर करण्यात आली. दरम्यान, जीएसटी परिषदेच्या बैठकीत राज्यांच्या जीएसटी भरपाईसाठी केंद्र सरकारने 1.58 लाख कोटीचे कर्ज घेण्याचे तसेच जीएसटी भरपाई उपकर आकारणीचा कालावधी ठरविण्यासाठी जीएसटी परिषदेची स्वतंत्र बोलावण्याचेही ठरले. तर आयात उपकरणे, औषधांना 31 ऑगस्टपर्यंत आयजीएसटीमध्ये सवलत देण्याचा त्याचप्रमाणे काळ्या बुरशीवरील उपचारासाठी वापरल्या जाणाऱ्या अॅम्फोटरीसीन बी या औषधासाठी देखील 31 ऑगस्टपर्यंत आयजीएसटीमध्ये सवलत देण्याचा निर्णय जीएसटी परिषदेने केला होता. 

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांच्या अध्यक्षतेखाली गुरुवारी झालेल्या जीएसटी परिषदेच्या बैठकीत पीटीआरने गोव्याचे छोटेसे राज्य असल्याचे सांगून गोव्याचा अपमान केल्याचा आरोप गोडिन्हो यांनी शनिवारी केला होता. गोविन्हो म्हणाले होते की, त्यांनी गोव्यातील जनतेची माफी मागावी. यावर तामिळनाडूच्या अर्थमंत्र्यांनी म्हटले की, 'आपण गोव्यतील जनतेचा अपमान केला नाही त्यामुळे मी माफी मागणार नाही. मी गोव्याच्या अधिकारासाठी बोललो आहे माझा तुम्हाला इजा करण्याचा हेतू नव्हता.''

मंत्रिगटातील सदस्य 
मेघालयाचे मुख्यमंत्री कोनराड संगमा हे या मंत्रिसमूहाचे समन्वयक असतील. तर गुजरातचे उपमुख्यमंत्री नितीन पटेल, महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार, गोव्याचे परिवहन मंत्री मौविन गोदिन्हो, केरळचे अर्थमंत्री के. एन. बालगोपाल, ओडिशाचे अर्थमंत्री निरंजन पुजारी, तेलंगणचे अर्थमंत्री टी. हरीश राव आणि उत्तर प्रदेशचे अर्थमंत्री सुरेश कुमार खन्ना हे सदस्य असतील.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com