सहकारी पतसंस्थेच्या वसुली अधिकाऱ्यांना मार्गदर्शन 

गोव्यातील बहुतेक सहकारी पतसंस्थांना थकबाकीची वसुलीचा प्रश्न भेडसावत आहे, या पार्श्वभूमीवर ही कार्यशाळा मदतरुप ठरणारी आहे.
सहकारी पतसंस्थेच्या वसुली अधिकाऱ्यांना मार्गदर्शन 
सहकारी पतसंस्थेच्या वसुली अधिकाऱ्यांसाठी आयोजित केलेल्या मार्गदर्शन कार्ययशाळेचे उदघाट करताना बाबाजी सावंत. सोबत इतर मान्यवर.Dainik Gomantak

फातोर्डा: दक्षिण गोव्यातील सहकारी पतसंस्थेच्या (In Co-operative Credit Society of Goa) वसुली अधिकाऱ्यांना सहकार खाते, पैंगीण अर्बन व मडगाव स्कुल कॉम्पलेक्स पतसंस्थेच्या संयुक्त विद्यमाने मार्गदर्शन (Guidance) करण्यासाठी कार्यशाळेचे (workshop) आयोजन करण्यात आले. कार्यशाळेचे उदघाटन रवीन्द्र केळेकर ज्ञानमंदिर हायस्कुलचे मुख्याध्यापक तसेच पैंगीण सहकारी पतसंस्थेचे सचिव अनंत अग्नी यांच्या हस्ते करण्यात आले. या प्रसंगी मडगाव स्कुल कॉम्पलेक्स सोसायटीचे चेअरमन बाबाजी सावंत, कार्यशाळेत मार्गदर्शन करणारे तज्ञ मंगेश फडते, राजू मगदूम तसेच प्रवीण भट, संदीप रेडकर, किसन फडते आदी मान्यवर उपस्थित होते.

सहकारी पतसंस्थेच्या वसुली अधिकाऱ्यांसाठी आयोजित केलेल्या मार्गदर्शन कार्ययशाळेचे उदघाट करताना बाबाजी सावंत. सोबत इतर मान्यवर.
Goa Police: नाट्यमय गुन्ह्याचा पोलिसांकडून पर्दाफाश

गोव्यातील बहुतेक सहकारी पतसंस्थांना थकबाकीची वसुलीचा प्रश्न भेडसावत आहे, या पार्श्वभूमीवर ही कार्यशाळा मदतरुप ठरणारी आहे. ही कार्यशाळा मडगाव स्कुल कॉम्पलेक्सच्या सहकारी पतसंस्थेच्या सभागृहात आयोजित करण्यात आली व दिवसभर चाललेल्या या कार्यशाळेला उत्तम प्रतिसाद लाभला.

वसुली करण्याचे अधिकार आसा सहकारी पतसंस्था देण्यात आले आहेत. या संदर्भात सहकार कायद्याच्या कलमामध्ये कशा प्रकारच्या तरतुदी आहेत या बद्दलची माहिती उपस्थितांना देण्यात आली. शिवाय वसुलीसाठी जी नियमावली तयार करण्यात आली आहे, तिचे पालन कसे करावे. या बद्दलची सविस्तर माहिती मंगेश फडते यांनी दिली.

सहकारी पतसंस्थेच्या वसुली अधिकाऱ्यांसाठी आयोजित केलेल्या मार्गदर्शन कार्ययशाळेचे उदघाट करताना बाबाजी सावंत. सोबत इतर मान्यवर.
Goa : कळंगुटला झोपडपट्टीवासीयांचा होतोय जाच

कर्ज देताना कर्जदात्यांची हप्ते भरण्याची क्षमता तपासणे गरजेचे आहे व हप्ते थकले तर त्याची सुचना लगेच कर्जदाराला दिली पाहिजे यावर चर्चेत भर देण्यात आला.या कार्यशाळेत ज्या सहकारी पतसंस्थेच्या अधिकाऱ्यानी उपस्थिती लावली त्यात कुडचडे अर्बन. कुंकळ्ळी, लक्ष्मी नरसिंह, केपे अर्बन, सहकार, जनविकास, सडा, समृद्धी, रोजगार, काणकोण, कुर्टी व्ही के एस एस, पैंगीण अर्बन यांच्यासह एकुण 20 सहकारी पतसंस्था अधिकाऱ्यांचा समावेश होता.

सुरुवातीला सकाळच्या सत्रात मंगेश फडते यांनी सर्वांचे स्वागत केले तर बाबाजी सावंत यांनी सर्वांचे आभार व्यक्त केले.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com