तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार!

प्रल्हाद पै : ‘गोमन्तक’ यंग इन्स्पिरेटर्स नेटवर्कच्या कार्यक्रमात विद्यार्थ्यांना मार्गदर्शन
Gomantak YIN
Gomantak YIN Dainik Gomantak

हरमल : व्यक्तिमत्व विकास म्हणजे सकारात्मकता, आत्मविश्वास. यावरूनच आपले मूल्यमापन केले जाते. आपल्या स्वार्थासाठी किंवा स्वतःसाठी मोठे होण्याचे स्वप्न बघू नये. तर राष्ट्रहित डोळ्यासमोर ठेवून देश मोठा व्हावा यासाठी आपण स्वप्ने पाहावीत. समाजाबद्दल कृतज्ञ राहून सकारात्मक दृष्टीने वाटचाल केल्यास आयुष्यात आपल्याला यश नक्कीच मिळेल, ते पूर्णपणे आपल्याच हाती आहे, कारण ‘तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार’ असे प्रतिपादन जीवन विद्या मिशनचे प्रमुख आणि लाईफ मॅनेजमेंट गुरु प्रल्हाद वामनराव पै यांनी केले.

हरमल पंचक्रोशी शिक्षण मंडळाच्या हायर सेकंडरीच्या विद्यार्थ्यांना ‘व्यक्तिमत्व विकास’ विषयावर मार्गदर्शन करताना ते बोलत होते. यावेळी माजी मुख्यमंत्री तथा मंडळ संस्थेचे अध्यक्ष लक्ष्मीकांत पार्सेकर, ‘गोमन्तक’चे संपादक-संचालक राजू नायक, प्राचार्य राज देसाई, यंग इन्स्पिरेटर्स नेटवर्कचे अंकित काणे आदी मान्यवर उपस्थित होते.

Gomantak YIN
डिचोली-दोडामार्ग रस्त्यावर गुरांचे साम्राज्य

‘आपण समाजाचे देणे लागतो. त्यामुळे आपले आई वडील, मित्रपरिवार, नातेवाईक, शिक्षक आणि आपण शिक्षण घेत असलेली संस्था अशा सर्वांच्या प्रति आपण कृतज्ञ असले पाहिजे. कारण या सर्वांमुळेच आपण आहोत, ही भावना महत्वाची आहे. त्यातूनच दुसऱ्याला काहीतरी देण्याची आपली मानसिकता विकसित होऊ शकते’ असे मार्गदर्शन पै यांनी विद्यार्थ्यांना केले.

प्रारंभी संस्थेच्या आवारात प्रल्हाद पै यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. पार्सेकर यांनी पै यांचे स्वागत केले. ‘गोमन्तक’चे संपादक-संचालक राजू नायक यांनी प्रास्ताविक केले, तर प्राचार्य राज देसाई यांनी पै यांचा परिचय करून दिला. रुपल चोडणकर यांनी सूत्रसंचालन केले. शाविना शिरोडकर यांनी आभार मानले.

Gomantak YIN
Gomantak YIN Dainik Gomantak

नागरिक म्हणून सामोरे जाण्यासाठी आपल्याला काही गुण आत्मसात करावे लागतात. अभ्यासासोबतच मराठी,इंग्रजी,कोकणी वर्तमानपत्रे, चांगली पुस्तके वाचा. विशेषतः यूपीएससीत उत्तीर्ण झालेल्यांच्या मुलाखती वाचा. शिक्षकांनीही पाठ्यपुस्तकांसह अन्य कौशल्यांची माहिती विद्यार्थ्यांना द्यावी. चांगले मित्र तुम्ही बनवा, त्यामुळे ज्ञान वाढीस मदत होऊ शकते.

- राजू नायक (संपादक-संचालक, गोमन्तक).

आमच्या शिक्षण संस्थेत गोव्याच्या दुर्गम भागातूनही विद्यार्थी येतात. त्यांच्यात काही करून दाखवण्याची महत्त्वकांक्षा असून ही आशादायी बाब आहे. मनुष्य हा विद्यार्थिदशेतच घडत असतो. त्यामुळे त्या योग्य वयात संस्कार होणे गरजेचे आहे. यासाठी गोमन्तक अन्‌ यंग इन्स्पिरेटर्स नेटवर्क कायमच पुढाकार घेत असते, त्याबद्दल त्यांचे विशेष आभार. - लक्ष्मीकांत पार्सेकर (अध्यक्ष, हरमल पंचक्रोशी शिक्षण मंडळ)

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com