आयआयटी विरोधात मेळावलीवासीय ग्रामस्थांचा पंचायतीवर धडक मोर्चा

गोमन्तक वृत्तसेवा
मंगळवार, 1 सप्टेंबर 2020

गुळेली पंचायतीची मासिक बैठक होती, यामुळे सर्व पंचमंडळ एकत्र मिळणार यासाठी आज आयआयटी विरोधकांनी आपले म्हणणे पंचायत मंडळासमोर मांडले.

गुळेली: गुळेली आयआयटी विरोधात वातावरण तापले असून आज मेलावली पंचक्रोशी ग्राम बचाव आंदोलन समितीतर्फे गुळेली ग्रामपंचायतीवर सुमारे दीडशे लोकांच्या उपस्थितीत सरपंचांना निवेदन सादर करून यावर योग्य तो निर्णय घेण्यासाठी सरपंचांनी ३ सप्टेंबर पर्यंत मुदत मागितली आहे.

गुळेली पंचायतीची मासिक बैठक होती, यामुळे सर्व पंचमंडळ एकत्र मिळणार यासाठी आज आयआयटी विरोधकांनी आपले म्हणणे पंचायत मंडळासमोर मांडले. या समितीतर्फे एक शिष्टमंडळ त्यात शुभम शिवोलकर, समन्वयक शशिकांत सावर्डेकर, निलेश मेळेकर, राम मेळेकर व इतर यांनी एकूण या मेलावली भागातील नागरिकांची मागणी काय आहे, एकूण या आयआयटी प्रकल्पाला लोकांचा का विरोध आहे.

या प्रकल्पामुळे लोकांच्या जाणाऱ्या जमिनी या विषयी सविस्तर माहिती शुभम शिवोलकर यांनी सरपंच अपूर्वा च्यारी व इतर पंचायत मंडळासमोर मांडली. पंचायतीकडे त्यांनी‌ सहा खात्यास पाठवण्यासाठी अर्ज दिले, त्यात रेव्हेन्यू सेक्रेटरी, कलेक्टर उत्तर गोवा, टेक्नीकल डिपार्टमेंट, आयटी गोवा, एक्झिक्युटिव्ह इंजिनिअर सार्वजनिक बांधकाम खाते आणि चिफ प्रिन्सिपल सार्वजनिक बांधकाम खात्याचा समावेश आहे.

सचिव मुला वरक म्हणाले, या अर्जावर विचार करुन निर्णय घेणार आहे. निवेदन दिल्यानंतर या ठिकाणी निवेदन देण्यात आलेले मेलावलीवासी पंचायत मंडळाची बैठक होईपर्यंत, त्या ठिकाणी ठाण मांडून बसले. सरपंचांनी उपस्थितासमोर येऊन आपले म्हणणे मांडण्याचा प्रयत्न केला. तीन सप्टेंबर रोजी आपण काय तो निर्णय सांगते, असे सांगितले  

पंचायत मंडळापैकी आज सरपंच अपूर्वा च्यारी, उपसरपंच नितेश गावडे, पंच अर्जुन मेळेकर, विठ्ठल कासकर, विनोद गावकर व अस्मिता मेळेकर उपस्थित होते.

 

संपादन: ओंकार जोशी

संबंधित बातम्या