Goa Crime News|...अखेर कुडचडे खुनासाठी वापरलेली बंदूक सापडली

कुडचडे पोलिसांनी दि.12 रोजी जोरविस मोराईस यांना अटक करण्यात आली होती पण हल्ला करण्यासाठी वापरण्यात आलेली बंदूक सापडू शकली नव्हती
Curchorem Murder | Goa Crime
Curchorem Murder | Goa CrimeDainik Gomantak

केपे: कुडचडे येथील गोळीबार प्रकरणी कुडचडे पोलिसांनी दि.12 रोजी जोरविस मोराईस यांना अटक करण्यात आली होती पण हल्ला करण्यासाठी वापरण्यात आलेली बंदूक सापडू शकली नव्हती पण काल दि.15 रोजी कुडचडे पोलिसांनी सिंगल बोर बंदूक जप्त केली असल्याचे सांगितले आहे.

(Finally, the gun used in Kudchde's murder was found)

Curchorem Murder | Goa Crime
Goa Road| टीसीपी दुरुस्ती रद्द करा, अन्यथा रस्त्यावर उतरू; रेनबो वॉरियर्सचा इशारा

कुडचडे पोलिसांनी आज मोराईस याला परत एकदा केपे न्यायालयापुढे हजर केले असता मोराईस याला आणखी तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. कुडचडे पोलिसांनी सात दिवसांची कोठडी मागितली होती पण न्यायालयाने तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.पोलिसांनी तप्त केलेली बंदूक फॉरेन्सिक प्रयोगशाळेत पाठवणार असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.

दि.31 रोजी मध्यरात्री बाणसाय येथे जुवारी नदीच्या फाट्यात बेकायदेशीर रेती घेऊन येताना तीन मजुरांवर बंदुकीने गोळीबार करण्यात आला होता यात एका मजुराचा जागीच मृत्यू झाला होता तर एक गंभीर जखमी झाला होता. बेकायदेशीर रेती व्यवसायातून हा हल्ला झाल्याचे बोलले जात असून पोलीस पुढील तपास करीत आहेत.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com