पार्सेत एकाच्या आत्महत्येवरून तणाव

प्रतिनिधी
शुक्रवार, 18 सप्टेंबर 2020

पार्से येथील गुरुदास पार्सेकर (४० वर्षे) यांनी पणजी येथील अटल सेतूवरून बुधवारी रात्री (ता.१६) उडी मारून आत्महत्या केली. शवचिकित्सा व कोरोना चाचणी केल्यानंतर त्यांचा अहवाल सकारात्मक आल्यामुळे मृतदेह घरापर्यंत नेण्यास एका स्थानिक गटाने विरोध केला. 

मोरजी: पार्से येथील गुरुदास पार्सेकर (४० वर्षे) यांनी पणजी येथील अटल सेतूवरून बुधवारी रात्री (ता.१६) उडी मारून आत्महत्या केली. शवचिकित्सा व कोरोना चाचणी केल्यानंतर त्यांचा अहवाल सकारात्मक आल्यामुळे मृतदेह घरापर्यंत नेण्यास एका स्थानिक गटाने विरोध केला. 

गुरुदास पार्सेकर यांच्या भावाने रजनीकांत पार्सेकर यांनी पेडणे पोलिसांत तक्रार देताना आपल्या भावाच्या आत्महत्येला गावातील काही स्थानिक युवक जबाबदार असल्याचा आरोप करून त्यांनी संशयितांच्या नावे तक्रार केली आहे. संशयिताला पोलिसांनी अटक करावी, अशी मागणी त्यांनी केली. करण्यात आली . काही काळ वातावरण तंग झाले .

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दोन दिवसांपूर्वी पेडणे पोलिस उपनिरीक्षकांनी आपल्या सहकाऱ्यांसह पार्से येथे जे ड्रग्जमध्ये सहभागी असल्याच्या संशयावरून काही जणांच्या घरावर छापा टाकून काही जणांना चौकशीसाठी ताब्यात घेतले होते. मात्र याची पोलिस स्थानकात कोणतीच नोंद नाही. पार्से भागातील काही युवक ड्रग्स व्यवसायात गुंतल्याचा संशय पोलिसांना आल्यामुळे पोलिसांनी हा छापा घातला होता. काही युवकांना ताब्यात घेतल्याचे काही गावकऱ्यांनी पाहिले होते. 

गुरुदास पार्सेकर यांच्या आत्महत्येस संशयित युवक कारणीभूत असल्याचा दावा रजनीकांत यांनी केला आहे. या संदर्भात त्यांनी पोलिसांत तक्रार केली 
आहे. 

गुरुदास यांनी १६ रोजी आत्महत्या केली. १७ रोजी शवचिकित्सा करण्यात आली. त्यावेळी त्यांचा कोरोना चाचणी अहवाल सकारात्मक कसा आला? असा सवाल स्थानिकांनी उपस्थित करून त्यांचा मृतदेह घरात घेण्यास विरोध केला. मृतदेह घराबाहेर ठेवून नंतर त्यांच्यावर अंत्यसंस्कार स्थानिक स्मशानभूमीत केले.

पोलिसांनी सखोल तपास करावा
या आत्महत्येमागे वेगळेच कारण आहे. अमलीपदार्थ प्रकरणातून या दुर्घटनेचा सखोल तपास पोलिसांनी करावा, अशी मागणी पार्सेचे माजी जिल्हा पंचायत सदस्य दीपक कलंगुटकर यांनी केली. व्यसनी युवकांना चांगल्या मार्गावर आणण्यासाठी स्थानिक आमदार, पंचायत मंडळाने एकत्रित येवून त्यावर तोडगा काढावा. पोलिसांनी ज्यांना चौकशीसाठी ताब्यात घेतले होते. त्यांची माहिती उपलब्ध करणे आवश्‍यक असल्याचे त्यांनी सांगितले.

संबंधित बातम्या