Goa पोलिसांकडून फोंड्यात 'हॅकेथन' स्पर्धा

हॅकेथन 2022 स्पर्धेला विद्यार्थी स्पर्धकांचा उत्साही प्रतिसाद लाभला.
Goa Police
Goa PoliceDainik Gomantak

Goa Police: राज्यातील विविध सायबर गुन्ह्यांचा छडा लावण्यासाठी उपयुक्त ठरणारी पद्धती शोधून काढण्यासाठी गोवा पोलिसांतर्फे आयोजित करण्यात आलेल्या हॅकेथन 2022 स्पर्धेला विद्यार्थी स्पर्धकांचा उत्साही प्रतिसाद लाभला. ही स्पर्धा आयआयटी तसेच इतर तांत्रिक विद्यालये व महाविद्यालयातील मिळून एकूण त्रेपन्न (53) विद्यार्थी सहभागी झाले आहेत. स्पर्धेचे बक्षीस वितरण आज दुपारी करण्यात येईल. ही स्पर्धा फर्मागुढीतील गोवा अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या सहकार्याने आयोजित करण्यात आली आहे.

या स्पर्धेची पाहणी करण्यासाठी आज गोवा पोलिस महासंचालक जसपाल सिंग तसेच पोलिस महानिरीक्षक ओमवीर सिंग व इतर पोलिस अधिकाऱ्यांनी भेट दिली. यावेळी गोवा अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य आर. बी. लोहानी तसेच आयआयटी गोवा प्रमुख बी. के. मिश्रा व इतर उपस्थित होते.

Goa Police
Sonali Phogat हत्येचा मुख्य सुत्रधार अन् हेतू अस्पष्टच; गोवा पोलिस

या अभिनव स्पर्धेसंबंधी पोलिस महासंचालक जसपाल सिंग म्हणाले की, गुन्हेगार आता गुन्ह्यांसाठी वेगवेगळ्या क्लृप्त्या वापरत आहेत. गुन्हा करण्याची तऱ्हा आणि पद्धतही बदलली आहे. सायबर गुन्ह्यांतही मोठ्या प्रमाणात वाढ झाली असून पोलिस गुन्हे सोडवण्यासाठी सक्षम असून त्यासाठी सातत्याने प्रयत्न करीत आहेत.

मात्र, काही तांत्रिक बाबी अधिक विकसित होऊन त्याचा तपासकामासाठी योग्य उपयोग व्हावा यासाठी गोवा पोलिस व आयआयटी गोवाने एक सामंजस्य करार केला असून त्यातून या क्षेत्रातील हुशार विद्यार्थ्यांकडून तपासाच्यादृष्टीने अधिक चांगले प्रयोग करून त्यातून तपासाला योग्य दिशा प्राप्त व्हावी यासाठी ही स्पर्धा आयोजित केली आहे.

Goa Police
Sonali Phogat हत्येचा मुख्य सुत्रधार अन् हेतू अस्पष्टच; गोवा पोलिस

या स्पर्धेसाठी पहिले बक्षीस 25 हजार, दुसरे 15 हजार, तर तिसरे 10 हजार ठेवण्यात आले आहेत. विद्यार्थ्यांच्या कौशल्याचा वापर नवनवीन तंत्रज्ञान विकसित करण्यासाठी व्हावा यासाठी अशाप्रकारचा उपक्रम आयोजित करण्यात आला असून पंतप्रधान नरेंद्र मोदी तसेच गृहमंत्री अमित शहा यांच्या सूचनेनुसार गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस खात्यात आमूलाग्र बदल होत असल्याचेही जसपाल सिंग यांनी नमूद केले.

संगणक, मोबाईल व तत्सम उपकरणे आदींचे पासवर्ड हॅक करून होणारे सायबर गुन्हे काबूत आणण्यासाठी प्रभावी यंत्रणा उभी करणे व अशा गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी नवीन युक्त्या व क्लृप्त्यांचा अवलंब करण्यासाठी योजना आखणे या थिमवरच हॅकेथन स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे.

Goa Police
Goa Crime : हळदोण्यात दुचाकींच्या डिकीतून मोबाईल चोरणारा आरोपी अखेर गजाआड

राज्यातील आणि पूर्ण देशातील पोलिस सध्या गुन्ह्यांच्या तपासासाठी सीसीटीव्ही फुटेजवर निर्भर आहेत, पण गुन्हेगार नवनवीन युक्त्या शोधत असल्याने त्याचा पाठपुरावा करताना पोलिसांची दमछाक होत असून तपासासाठी सीसीटीव्हीपेक्षा अन्य काही साधने पोलिसांकडे आहेत का?असे विचारल्यावर पोलिस महासंचालक जसपाल सिंग (DSP Jaspal Singh) यांनी सीसीटीव्ही उपयुक्त आहेच, पण त्याहीपेक्षा महत्त्वाचे म्हणजे गुन्हेगार अनेक पद्धती वापरत असल्याने त्यादृष्टीने पोलिसही सक्षम होत आहेत.

गुन्हेगारांचा मागोवा घेताना पोलिसही विविध उपकरणे व शोधांचा आधार घेत असून हॅकेथन स्पर्धा हा त्याचाच एक भाग आहे. त्यातून नवीन काही तरी निघेल आणि ते तपासासाठी उपयुक्त ठरेल, असा विश्‍वास जसपाल सिंग यांनी व्यक्त केला.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com