Happy Birthday: वाढदिनी गोव्याचे मुख्‍यमंत्री प्रमोद सावंत अनुपलब्‍ध

गोमंन्तक वृत्तसेवा
शनिवार, 24 एप्रिल 2021

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत हे वाढदिवसानिमित्त आज शासकीय निवासस्थान, साखळी येथील खासगी निवासस्थान, कार्यालय आदी कोणत्याही ठिकाणी शुभेच्छा स्वीकारण्यासाठी उपलब्ध नसतील. 

पणजी : मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत हे वाढदिवसानिमित्त आज शासकीय निवासस्थान, साखळी येथील खासगी निवासस्थान, कार्यालय आदी कोणत्याही ठिकाणी शुभेच्छा स्वीकारण्यासाठी उपलब्ध नसतील. मुख्‍यमंत्री आज सायंकाळी 7 वा. गोवा नागरीकांना संबोधित करणार आहेत
 

कोविड महामारीच्या काळात शुभेच्छा देताना गर्दी होऊ नये, यासाठी त्यांनी उद्या कोणालाही न भेटण्याचे ठरवले आहे. मुख्यमंत्री कार्यालयातून ही माहिती देण्यात आली आहे.

आज वाढदिनी या लढ्यातच माझे योगदान मी देणार आहे. कोविड मार्गदर्शक तत्त्‍वांचे पालन करून सर्वांनी स्वतः सुरक्षित राहावे आणि आपल्या कुटुंबियांनाही सुरक्षित ठेवावे. शुभेच्छांचे केवळ संदेश पाठवावेत. 10294307544 या भारतीय स्टेट बॅंक सचिवालय शाखेतील खात्यात मुख्यमंत्री सहाय्‍यता निधीत देणगी दिल्यास मला आनंदच होईल, असे सांवत यांनी सांगितले. 

खासगी रुग्णालयातील शुल्कात कपात; विकास गौणेकर यांचा निर्णय 

संबंधित बातम्या