पोलिस शोधमोहिमेमुळे कट्टर गुन्हेगार भूमिगत 

police
police

पणजी

सांताक्रुझ येथील टोळीयुद्धनंतर राज्यात कायदा व सुव्यवस्था अधिक कडक करताना गुन्हेगारांची यादी तयार करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. पोलिसांनी गुन्हेगारी पार्श्‍वभूमी असलेल्या कट्टर गुन्हेगारांची शोधमोहीम सुरू केल्याने बहुतेक भूमिगत झाले आहेत. ज्या गुन्हेगारांविरुद्ध जिल्हाधिकाऱ्यांसमोर तडिपारसाठी सुनावणी सुरू त्याचाही आढावा पोलिसांनी घेण्यास सुरुवात केली आहे. मुख्यमंत्र्यांनी हल्लीच पोलिस मुख्यालयात घेतलेल्या बैठकीनंतर पोलिस तपास यंत्रणा गतिमान झाली आहे.  
राज्यातील सांताक्रुझ, चिंबल, मेरशी, बेती, ताळगाव भागात तसेच मांगोर हिल, मोती डोंगर तसेच झुआरीनगर झोपडपट्टी परिसरामध्ये काही वर्षापूर्वी गुन्हेगारांची दहशत होती मात्र गुन्हेगारांच्या टोळीयुद्धामध्येच काहीजण मारले गेल्याने त्यामध्ये काही प्रमाणात खंड पडला होता मात्र आजकाल शिक्षण अर्धवट सोडलेले तरुण तसेच काही अल्पवयीन मुले गुन्हेगारीकडे वळली आहेत. गुन्हेगारीची पार्श्‍वभूमी आहे त्या कट्टर गुन्हेगाराच्या टोळीमध्ये सामील होतात. गुंडगिरी करून व्यापरांकडून खंडणी वसूल करण्याचे तसेच ऐशआरामात जीवनशैली घालवण्याची सवय झाल्यावर ते आपली दहशत गाजविण्यास सुरुवात करतात. अशाप्रकारे काही तरुणांना आपापल्या परिसरात दहशत निर्माण केली आहे व ते मोठ्या गुन्हेगारी टोळ्यांसाठी काम करतात. प्रत्येक पोलिस ठाण्यामध्ये अशा गुन्हेगारांची माहिती जमा करण्यात येत असल्याने काहीजण घरीच राहत नाहीत. या गुन्हेगारांची माहिती पोलिसांनी मिळवून त्यांच्यावर नजर ठेवण्याचे काम आता प्रत्येक पोलिस ठाण्याच्या साध्या वेशातील स्थानिक माहिती पोलिसांकडे (एलआयबी) सोपविण्यात आले आहे. 
अनेक गुन्हे ज्या गुन्हेगाराविरुद्ध पोलिस ठाण्यात दाखल झाले आहेत त्याच्या फाईल्स पोलिसांनी तयार केलेल्या आहेत. त्यांच्याविरुद्ध गुन्ह्यांची दखल घेत तसेच चॅप्टर केसेस नोंद करून त्या जिल्हाधिकाऱ्यांकडे तडिपार प्रक्रियेसाठी प्रकरणे पाठविली जातात. मात्र ही प्रकरणे दाखल करून अनेक वर्षे त्यावर निर्णय होत नसल्याने सुनावणीवेळी अडचणी येत आहेत. जोपर्यंत ही प्रकरणे सुनावणीस येतात त्या काळात संबंधित गुन्हेगाराविरुद्ध गुन्हा पोलिस नसतो. त्यामुळे त्याला तडिपार करतानाही निर्बंध येतात. त्यामुळे ही प्रकरणे जिल्हाधिकाऱ्यांनी सहा महिन्यात निकालात काढण्याची गरज आहे असे मत एका पोलिस अधिकाऱ्यांने व्यक्त केली. 
सांताक्रुझ व ताळगाव या भागात पुन्हा गुन्हेगारी प्रवृत्तीच्या तरुणांनी डोके वर काढले आहे. मद्यधुंद अवस्थेत या टोळ्या रात्रीच्यावेळी फिरत असतात. काहीजण धमकावण्याच्या तसेच मारहाण करण्याचे प्रकारही करतात. त्यामुळे पुन्हा त्यांनी दहशत माजविण्यास सुरू केले आहे. जुने पोलिस स्थानकाच्या कक्षेतील गुन्हेगारांच्या टोळ्या वाढल्या तरी या परिसरात पोलिसांचे नियंत्रण तसेच दडपण या गुन्हेगारांवर राहिलेले नाही. काही पोलिसांचे गुन्हेगारांशीच साटलोटे असल्याने त्याचा गैरफायदा गुन्हेगार उठवून लोकांमध्ये दहशत निर्माण करतात तसेच ‘प्रोटेक्शन’च्या नावाखाली व्यापाऱ्यांकडून हप्तेही जमा करतात. 

सांताक्रुझ टोळीयुद्धप्रकरणी आतापर्यंत १९ संशयितांना अटक तर तीन बालगुन्हेगारांना ताब्यात घेण्यात आले आहे. या संशयितांना उद्या
(२८ जून) पोलिस कोठडी वाढवून घेण्यासाठी न्यायालयात उभे केले जाणार आहे. या सर्व संशयितांचा पोलिस रिमांड आज संपल्या आहे. या प्रकरणातील कट्टर गुन्हेगार घटनेनंतर फरारी झाले आहेत. त्यांचा शोध घेण्यात येत आहे. या घटनेच्या दिवशी फरारी असलेले गुन्हेगार कोठे होते याचा तपास पोलिस करत आहेत.


 

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com