हरीजनांचे प्रश्न अजूनही तसेच: मगो नेते प्रवीण आर्लेकर

निवडून आलेल्या लोकप्रतीनिधिनी या हरिजन बांधवाचे प्रश्न आज पर्यंत सोडवले नाही.
हरीजनांचे प्रश्न अजूनही तसेच: मगो नेते प्रवीण आर्लेकर
Mago leader Praveen ArlekarDainik Gomantak

मोरजी: पेडणे (Pernem) या राखीव मतदार संघातून या पूर्वी निवडून आलेल्या लोकप्रतीनिधिनी या हरिजन बांधवाचे प्रश्न आज पर्यंत सोडवले नाही. केवळ निवडणुका आल्या कि मतदारांकडे मते मागायला आमदार मंत्री येतात आणि त्यानंतर मात्र ते ढूकुंनही पाहत नाही. सरकारने ऑनलाईन शिक्षण पद्धती सुरु केल्या मात्र ग्रामीण भागात इंटरनेटचे जाळे नसताना विद्यार्थ्यांना मोबाईलसाठी इंटरनेट कनेक्शन मिळवण्यासाठी रस्त्यावर जंगलात यावे लागते. आपल्याला जर एक संधी लोकांची सेवा करण्यासाठी आमदार बनवलेत तर आपण हरीजनाच्या सर्व मुलभूत गरजा आणि समस्या सोडविण अशी ग्वाही मगोचे नेते प्रवीण आर्लेकर (Praveen Arlekar) यांनी कोरगाव हरिजन वाड्यावरील विध्यार्थ्याना मोफत इंटरनेट सेवा उपलब्ध करून मगो तर्फे प्रवीण आर्लेकर यांनी दिले त्यावेळी शुभारंभ केल्यानंतर ते बोलत होते.

हरिजन वाडा कोरगाव येथे मगो तर्फे या परिसरातील विध्यार्थ्याना शिक्षणासाठी ऑनलाईन इन्टरनेटसेवा 10 रोजी वितरीत केली. त्यावेळी कोरगाव माजी सरपंच सुदीप कोरगावकर, नरेश कोरगावकर, स्थानिक नेते सखाराम कोरगावकर, जयेश पालयेकर स्थानिक नागरिक व गरजवंत विद्यार्थी उपस्थित होते. यावेळी हरिजन परिसरातील विद्यार्थी उपस्थित होते त्यांच्या चेहऱ्यावर एक प्रकारचा उत्साह दिसून येत होता, घर बसल्या शिक्षणासाठी इन्टरनेट सेवा उपलब्ध होत असल्याने विद्यार्थ्यांनी समाधान व्यक्त केले.

Mago leader Praveen Arlekar
Goa: भाजप सरकारकडून 'आप' मॉडेलची नक्कल

मगोचे नेते प्रवीण आर्लेकर यांनी बोलताना सरकारने अगोदर ऑनलाईन शिक्षण सुरु करताना कोण कोणत्या भागात इन्टरनेट सेवा मिळत नाही त्या ठिकाणी ती सेवा द्यायला हवी होती, परतू ती न देताच ऑनलाईन शिक्षण पद्धत सुरु केली त्या बद्दल नाराजी व्यक्त करून विधार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान झाल्याचा दावा केला. माजी सरपंच सुदीप कोरगावकर यांनी बोलताना या हरिजन वाड्यावर अनेक समस्या आहेत. आपण सरपंच असताना अनेक सोयी सुविधा उपलब्ध करून दिल्या मात्र आमदारांनी या वाड्यावरील लोकांच्या मतावर आमदार झाले त्यांनी कोणत्याच प्रकारच्या सोयी पुरवल्या नाहीत आता प्रवीण आर्लेकर याना एक संधी देवून विकास कामे करून घेण्याचे आवाहन केले.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak
www.dainikgomantak.com