चालकाचेच आले रोडरोलरखाली डोके जागीच झाला गतप्राण

गोमन्तक वृत्तसेवा
शनिवार, 30 जानेवारी 2021

म्हापसा येथून हळदोणे येथे जाणाऱ्या रोडरोलरखाली चिरडून त्याच वाहनाचा चालक आंतोनियो शिंपलीसिओ आब्रिओ  ठार झाला.

म्हापसा : म्हापसा येथून हळदोणे येथे जाणाऱ्या रोडरोलरखाली चिरडून त्याच वाहनाचा चालक आंतोनियो शिंपलीसिओ आब्रिओ (वय 55, रा. पेडे म्हापसा) ठार झाला. काल शुक्रवारी सकाळी अकराच्या दरम्यान ही घटना नास्नोडा येते घडली. चाकाखाली सापडल्याने डोके चिरडून तो जागीच गतप्राण झाला.

तो रोडलोरल म्हापशाहून हळदोणेच्या दिशेने जात असताना नास्नोडा उतरणीवर पोहचला असता रोलरच्या चाकाखाली झाडाची फांदी सापडली. त्या वेळी ते वाहन हालल्याने रोडलोरल रस्त्यावर कोसळेल या भीतीने चालकाने स्वत:चा जीव वाचवण्यासाठी वाहनावरून उडी मारली असता उतरणीवरून जाणाऱ्या त्या रोडरोलरच्या चाकाखाली तो सापडला असावा, असा कयास पोलिसांनी व्यक्त केला आहे. हळदोणे पोलिस चौकीला या अपघाताची माहिती मिळताच पोलिस हवालदार उमेश नाईक यांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला. मृतदेह बांबोळी येथील गोवा वैद्यकीय इस्पितळात उत्तरीय तपासणीसाठी पाठवला आहे.

गोवा विधानसभा अधिवेशन: सरकारी खात्यांतील आर्थिक गैरव्यवहार  विधानसभेच्या पटलावर -

गोव्यातील 509 आरोग्य कर्मचाऱ्यांना कोविड प्रतिबंधक लस -

संबंधित बातम्या