श्रीपाद नाईक यांच्या मतदार संघात आरोग्य शिबीराचे आयोजन

68व्या वाढदिवशी आरोग्य तपासणी व नेत्र तपसणी शिबीरांचे आयोजन
श्रीपाद नाईक यांच्या मतदार संघात आरोग्य शिबीराचे आयोजन
Union Minister Shripad NaikDainik Gomantak

पणजी: केंद्रिय पर्यंटन व जलमार्ग राज्यमंत्री श्रीपाद नाईक (Union Minister Shripad Naik) यांचा उद्या 68 वा वाढदिवस असून कोरोना संकटाचा धोका लक्षात तो साधेपणाने आयोजित करण्यात आला आहे. मात्र दरवर्षीप्रमाणे आरोग्य तपासणी व नेत्र तपसणी शिबीरांचे आयोजन करण्यात आले आहे. कुंभारजुवे मतदारसंघ (Cumbarjua Constituency) भाजप मंडळाच्या वतीने ही शिबीरे आयोजित करण्यात आली आहेत.

खोर्ली पंचायत सभागृहात सकाळी 9 वाजता मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत (CM Dr Pramod Sawant) हे या शिबीराचे उदघाटन करणार आहेत. यावेळी श्रीपाद नाईक यांच्यासह कुंभारजुवेचे आमदार पांडुरंग मडकईकर (MLA Pandurang Madkaikar), खोर्ली जि.पं. सदस्य सिद्धेश नाईक (ZP Member Siddhesh Naik) व भाजपचे पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत. आरोग्य तपासणी केल्यानंतर मोफत औषधे देण्यात येणार आहेत. तसेच डोळे तपासणीनंतर गरजूंना मोफत शस्त्रक्रियेची सोय केली जाणार आहे.

Union Minister Shripad Naik
Goa: प्रत्येक बूथवर केजरीवालांची 'रोजगार हमी' पोहचविण्यासाठी आप सज्ज

दुपारी 1.30 वाजेपर्यंत आरोग्य व डोळे तपासणी केली जाणार असून यासाठी प्रसाद नेत्रालय उडुपी, नेत्रा ज्योती चॅरीटेबल ट्रस्ट उडुपी व इसोलोर व्हीजन फाऊंडेशन बेंगळुरु यांचे सहकार्य लाभणार आहे.

Related Stories

No stories found.