हेल्थ केअर मॉडेल राज्यभर राबवणार : आरोग्यमंत्री विश्वजित राणे

दर बुधवारी वाळपई केंद्राला भेट देणार तज्ज्ञ डॉक्टर
Vishwajit Rane
Vishwajit Rane Dainik Gomantak

पणजी : राज्य सरकारच्या आरोग्य प्रशासनाच्या वतीने एकात्मिक आरोग्यसेवा (हेल्थ केअर) योजनेअंतर्गत अद्वितीय असे मॉडेल बनवण्यात आले आहे. सध्या प्रायोगिक तत्त्वावर वाळपई उपजिल्हा आरोग्य केंद्रांमध्ये हा प्रकल्प राबवण्यात येत आहे. हा प्रकल्प यशस्वी झाल्यास राज्यभरात राबवण्यात येईल, अशी माहिती आरोग्यमंत्री विश्वजित राणे यांनी दिली आहे. (Health care model to be implemented throughout Goa says Vishwajit Rane)

Vishwajit Rane
गोव्यातील तेलगळती विरोधी योजना कुचकामी

पणजीत घेण्यात आलेल्या बैठकीला बांबोळी इस्पितळाचे डीन डॉ. शिवानंद बांदेकर डॉ. कल्पना महात्मे यांच्यासह अन्य वैद्यकीय अधिकारी उपस्थित होते.

या योजनेअंतर्गत गोवा वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयातील तज्ज्ञ डॉक्टर दर बुधवारी वाळपई उपजिल्हा आरोग्य केंद्राला भेट देतील. प्रामुख्याने शस्त्रक्रिया, औषध, बाल रोग आणि स्त्री रोग विभागाच्या तज्ज्ञ डॉक्टरांच्या सहाय्याने हा बाह्य रुग्ण सेवा विभाग सुरू असेल. वाळपई येथे 2 जून पासून ही सेवा सुरू करण्यात येत असून या योजनेचे नोडल अधिकारी म्हणून डॉ. कल्पना महात्मे यांची नियुक्ती करण्यात आली आहे, अशी माहिती मंत्री राणे यांनी दिली आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com