निवासी डॉक्टरांना न्याय देऊ, आरोग्यमंत्र्यांचे आश्वासन

गोमन्तक वृत्तसेवा
रविवार, 1 नोव्हेंबर 2020

मंत्री विश्वजित राणे यांनी कोविड -१९ची सेवा बजावणाऱ्या निवासी डॉक्टरांना न्याय देण्याचे आश्वासन दिले आहे.

पणजी  : मंत्री विश्वजित राणे यांनी कोविड -१९ची सेवा बजावणाऱ्या निवासी डॉक्टरांना न्याय देण्याचे आश्वासन दिले आहे. राज्य सरकारतर्फे विविध रुग्णालयात देण्यात आलेल्या जबाबदाऱ्यांचा भाग म्हणून त्यांना देण्यात आलेली राहण्याची सुविधा मागे घेण्यात आल्याने निवासी डॉक्टर संघटना म्हणजेच गार्डने आंदोलन करण्याचा इशारा दिला होता. मात्र हा प्रश्न लवकरच सोडविणार असल्याचे मंत्री राणे यांनी सांगितले आहे.

मडगाव ईएसआय आणि दक्षिण जिल्हा रुग्णालयात कोरोनाबाबतचे उपचार करणाऱ्या शासकीय रहिवासाची सोय केलेल्या खोल्या रिकाम्या करण्यासाठी सांगितल्या आहेत. आम्ही जर हे काम करणार असू तर पूर्वीप्रमाणे दिलेल्या ठिकाणीच राहून काम करू, असा पवित्रा डॉक्टरांनी घेतला आहे. यासंदर्भात मंत्री राणे यांनी या समस्येबद्दल मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांना कल्पना दिल्याची माहिती दिली. शिवाय मुख्य सचिव आणि आरोग्य सचिवांना ईमेल केल्याचेही सांगितले. आम्ही सगळेजण आरोग्य सेवकांसोबत आहोत आणि त्यांच्या आयुष्याची जबाबदारी घेणे आमचे कर्तव्य असल्याचे मंत्री राणे 
म्हणाले.

संबंधित बातम्या