राज्यातील सर्व ग्रामीण भागात आरोग्य सेवा विस्तारू : विश्वजीत राणे

बांबोळी गोवा मेडिकल कॉलेजच्या सहयोगाने वाळपई आरोग्य केंद्रात विविध प्रकारची आवश्यक शस्त्रक्रिया विभाग सुरू केला आहे, अशी माहिती आरोग्यमंत्री विश्वजीत राणे यांनी दिली.
राज्यातील सर्व ग्रामीण भागात आरोग्य सेवा विस्तारू : विश्वजीत राणे
Vishwajit Rane Dainik Gomantak

वाळपई : आरोग्यमंत्री म्हणून कार्यरत असताना सत्तरीच्या ग्रामीण भागात चांगली सेवा पोहचविण्याचा यथोचित प्रयत्न केला आहे. राज्यातील सर्व ग्रामीण भागातही आरोग्य सेवेचे जाळे विस्तारण्यास मी कटिबद्ध आहे. बांबोळी गोवा मेडिकल कॉलेजच्या सहयोगाने वाळपई आरोग्य केंद्रात विविध प्रकारची आवश्यक शस्त्रक्रिया विभाग सुरू केला आहे, अशी माहिती आरोग्यमंत्री विश्वजीत राणे यांनी दिली.

Vishwajit Rane
खाणींची महसुली तूट ‘मोपा’ भरुन काढणार

वाळपई आरोग्य केंद्रात सुरू करण्यात आलेल्या सॅटलाईट ओपीडी विभागाच्या उद्‍घाटन कार्यक्रमात आज (गुरुवारी) ते बोलत होते. यावेळी गोवा मेडिकल कॉलेजचे डीन डॉ. शिवानंद बांदेकर, वाळपई नगराध्यक्षा शेहजीन शेख, आरोग्यमंत्री ओएसडी राजनंदा देसाई, डॉ. कल्पना महात्मे, केरी जिल्हा पंचायत सदस्य देवयानी गावस, नगरगाव जिल्हा पंचायत सदस्य राजश्री काळे, डॉ. शाम काणकोणकर, केंद्राचे प्रमुख डॉ. अभिजीत वाडकर, उपनगराध्यक्ष अनिल काटकर, नगरसेवक सय्यद सरफराज, रामदास शिरोडकर, फैजल शेख, शराफत खान, विनोद हळदणकर, विनोद शिंदे उपस्थित होते.

डॉ. बांदेकर म्हणाले, सत्तरीत ओपीडी सेवा सुरू करण्यासाठी आरोग्यमंत्री विश्वजित राणे यांचे महत्त्वाचे योगदान आहे. त्याच्या प्रयत्नाने ही ओपीडीची सुरवात होत आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com