गोव्यातील फक्त 28 हजार लोकांनाच बुस्टर डोस का?

लसीकरण अधिकाऱ्यांकडूम नियमावली जारी, आजपासून डोस दिला जाणार.
गोव्यातील फक्त 28 हजार लोकांनाच बुस्टर डोस का?
Health workers and senior citizens in Goa are eligible for booster doseDainik Gomantak

पणजी: राज्यात कोरोनाचे रुग्ण झपाट्याने वाढत आहेत. या रूग्णांमध्ये ओमिक्रॉन बधितांचा देखील समावेश आहे. ही राज्यासाठी चिंतेची बाब ठरत आहे. सध्या गोव्यात विधानसभा निवडणुकीचे बिगुल वाजले आहे. परिणामी राज्यात सर्वत्र निवडणुकीची (Election) तयारी सुरू आहे. अनेक पक्षांचे कार्यकर्ते घरोघरी जाऊन प्रचार करत आहेत. (Health workers and senior citizens in Goa are eligible for booster dose)

Health workers and senior citizens in Goa are eligible for booster dose
...म्हणून भाजप सोडण्याचा निर्णय घेतला, लोबोंचं स्पष्टीकरण

या प्रचारादरम्यान कोरोनाचा (Coronavirus) प्रादुर्भाव वाढू शकतो. दरम्यान, कोरोनाला आटोक्यात आणण्याच्या प्रयत्नात सरकारने सकारात्मक पाऊल उचलले आहे. आजपासून गोव्यातील (Goa) 28000 लोकांना बुस्टर डोस मिळणार आहे.

Health workers and senior citizens in Goa are eligible for booster dose
रेल्वे पुलाखाली सापडला एका इसमाचा मृतदेह

राज्य लसीकरण अधिकारी डॉ. राजेंद्र बोरकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, राज्यात जवळपास 28,000 लोक बुस्टर डोससाठी पात्र आहेत; या 28000 लोकांमध्ये आरोग्य कर्मराची व ज्येष्ठ नागरिकांचा समावेश आहे. सर्व आरोग्य केंद्र आणि गोवा मेडिकल कॉलेज येथे लसीकरण सुरू आहे , दुसरा डोस घेऊन 9 महिने पूर्ण झालेले लोक बुस्टर डोस घेण्यासाठी पात्र आहेत. यासाठी कोणतीही पुर्वनोंदणी अनिवार्य नाही.

निवडणुकीच्या काळात कोरोनावर आळा घालण्यासाठी सरकारने हे पाऊल उचलल्याचे तज्ज्ञ सांगतात. कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून सरकारने 15 ते 18 वयोगटातील मुलांचे देखील लसीकरण सुरू केले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com