कायद्याचे उल्लंघन करणाऱ्या 'नाईट क्लब'ना राज्य सरकारचा इशारा

गोमन्तक वृत्तसेवा
सोमवार, 19 ऑक्टोबर 2020

एका बाजूला कोरोनाचे बळी वाढत आहेत, सामूहिकपणे एकत्र येण्यास नियम व अटी आहेत. तरीही गोव्यात ‘सॅटर्डे नाईट'' पार्टी झाली, त्यामुळे त्याची दखल आरोग्य मंत्री विश्वजित राणे यांनी घेतली आहे. कायद्याचे उल्लंघन करणाऱ्या नाईट क्लबवर कारवाई करण्यात येईल, त्याचबरोबर त्यांचे परवानेही रद्द करण्यात येईल, असा इशारा त्यांनी दिला आहे. 

पणजी- शनिवारी रात्री झालेल्या एका पार्टीनंतर राज्य सरकार खडबडून जागे झाले आहे. एका बाजूला कोरोनाचे बळी वाढत आहेत, सामूहिकपणे एकत्र येण्यास नियम व अटी आहेत. तरीही गोव्यात ‘सॅटर्डे नाईट'' पार्टी झाली, त्यामुळे त्याची दखल आरोग्य मंत्री विश्वजित राणे यांनी घेतली आहे. कायद्याचे उल्लंघन करणाऱ्या नाईट क्लबवर कारवाई करण्यात येईल, त्याचबरोबर त्यांचे परवानेही रद्द करण्यात येईल, असा इशारा त्यांनी दिला आहे. 

कोरोनामुळे घातलेल्या नियमांचे उल्लंघन होत असेल, तर प्रमुख नाईट क्लबवर आपत्ती व्यवस्थापन कायद्यांतर्गत सरकार कारवाई करेल, असे सांगत मंत्री राणे म्हणाले की, याबाबत आपण मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांची भेट घेणार आहोत. जिल्हा प्रशासनाला त्या क्लबचे सर्व परवाने रद्द करण्याचे व नियमांचे उल्लंघन केल्याबद्दल त्यांच्या इतर परवानग्याही मागे घेण्याच्या सूचना दिल्या आहेत. एकीकडे राज्यात डॉक्टर कोरोनाच्या रुग्णांवर उपचार करण्यासाठी चोवीस तास झटत आहेत. तर दुसरीकडे नियमांचे उल्लंघन करण्यासाठी तरुणांना निमंत्रित केले जात आहे, असेच हे चित्र आहे. 

राणे पुढे म्हणाले, युवकांवर कोरोनाचे उपचार झाले आहेत, असे अनेक युवक आता प्लाझ्मा देण्यासाठी पुढे येत आहेत. राज्यातील पर्यटनाचा एक भाग असलेले उपक्रमही आता सुरू झाले पाहिजेत. परंतु घातलेल्या निकषांचे उल्लंघन करून जीव धोक्यात घालणेही न रुचणारे आहे. कोरोना झालेल्या रुग्णांवर उपचार करण्याची कोणतीही कसर सोडली जात नाही. त्यामुळे आमचे काही डॉक्टरांनाही संसर्ग झाल्याचे त्यांनी नमूद केले. मुख्यमंत्र्यांची आपण भेट घेऊन नाईट क्लबवर कारवाई करण्याविषयीची मागणी करणार आहोत. त्याचबरोबर पर्यटनाविषयी मानक कार्यप्रणाली (एसओपी) कशी कार्यान्वित केली जाईल, याचा आढावा सरकार घेईल आणि पर्यटकांना कोरोनाच्या संक्रमणापासून कसे दूर व सुरक्षित ठेवता येईल, याकडे लक्ष केंद्रित करेल, असेही राणे यांनी नमूद केले.

संबंधित बातम्या