राष्ट्रीय महामार्ग दुरवस्थेबाबतच्या अर्जावर उद्या सुनावणी

प्रतिनिधी
गुरुवार, 24 सप्टेंबर 2020

पेडणे तालुक्यातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्ग ६६ या रस्त्याची झालेली दुरवस्था आणि लोकांना होणारा त्रास यासंदर्भात पेडणे नागरिक कृती समितीचे एक सदस्य प्रसाद शहापूरकर व इतर सदस्यांनी मिळून  दाखल केलेल्या अर्जावर प्रथम न्यायदंडाधिकारी तसेच पेडणे उपजिल्हाधिकारी यांच्या या कार्यालयात या दोन्ही ठिकाणी दिनांक २५ रोजी सुनावणी होणार आहे

पेडणे: पेडणे तालुक्यातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्ग ६६ या रस्त्याची झालेली दुरवस्था आणि लोकांना होणारा त्रास यासंदर्भात पेडणे नागरिक कृती समितीचे एक सदस्य प्रसाद शहापूरकर व इतर सदस्यांनी मिळून  दाखल केलेल्या अर्जावर प्रथम न्यायदंडाधिकारी तसेच पेडणे उपजिल्हाधिकारी यांच्या या कार्यालयात या दोन्ही ठिकाणी दिनांक २५ रोजी सुनावणी होणार आहे

तालुक्यातील पत्रादेवी ते महाखाजन ते या भागातून राष्ट्रीय महामार्ग ६६ हा जात आहे आणि त्या मार्गावरील सध्या जी परिस्थिती निर्माण झाली आहे किंवा गेले काही महिने या भागातील नागरिक या रस्त्यावरून रस्त्यावरून जात असताना तो त्रास सहन करत आहे त्या संदर्भात वेळोवेळी संबंधित सरकारी यंत्रणा कंत्राटदार तसेच वृत्तपत्रातून आवाज उठून दखल घेण्याची विनंती केली गेली‌. परंतु या सर्व गोष्टींकडे संबंधित यंत्रणेने गांभीर्याने लक्ष न दिल्यामुळे आता नागरिक न्यायालयात गेले आहेत.      

पेडणेचे न्यायदंडाधिकारी यांच्याकडे श्री. शहापूरकर यांनी अर्ज दाखल करून पोरस्कडे  येथे रस्ता कोसळणे व रस्त्याची संरक्षक भिंत वाहून जाणे हा जो प्रकार घडला होता त्या प्रकारात कंत्राटदाराचा निष्काळजीपणा लोकांचा जीव धोक्यात घालण्याची परिस्थिती निर्माण केली त्याबद्दल गुन्हा नोंद करावा अशी मागणी पोलीस स्थानकात केली होती या अर्जावर पेडणे पोलीस स्थानकात कुठलीही दखल घेतली गेले नाहीत म्हणून अधीक्षक कार्यालय उत्तर गोवा यांच्याकडे अर्ज दाखल केला तर तिथेही काही न झाल्यामुळे शेवटी न्यायदंडाधिकाऱ्यांकडे अर्ज करून या संबंधित कंत्राटदारावर गुन्हा नोंद करावा असा आदेश देण्यात यावा  अशी याचना करणारा अर्ज सादर केला आहे. उपजिल्हाधिकारी कार्यालयात क्रिमिनल प्रोसीजर कोड कलम १३३ या खाली अर्ज दाखल करून निष्काळजीपणा व लोकांना त्रास होत आहे यासंदर्भात उपाययोजनां आखण्यास कंत्राटदाराला आदेश द्यावे अशी मागणी या अर्जातून केली आहे

या दोन्ही अर्जांवर दिनांक २५ रोजी सकाळी दहा वाजता व साडेअकरा वाजता सुनावणी होणार आहे.

संबंधित बातम्या