12 अपात्र आमदार प्रकरणावर भोजनोत्तर सत्रात  सुनावणी सुरू राहणार

गोमन्तक वृत्तसेवा
शुक्रवार, 26 फेब्रुवारी 2021

काँग्रेस आणि महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षातून भाजपमध्ये आमदारकीचा राजीनामा न  देता प्रवेश घेतलेल्या 12 आमदारांविरोधात 2 अपात्रता याचिकांवर आता  भोजनोत्तर सत्रात  सुनावणी सुरू राहणार आहे.

पणजी: काँग्रेस आणि महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षातून भाजपमध्ये आमदारकीचा राजीनामा न  देता प्रवेश घेतलेल्या 12 आमदारांविरोधात 2 अपात्रता याचिकांवर आता  भोजनोत्तर सत्रात  सुनावणी सुरू राहणार आहे.  आज सकाळी अकरा वाजल्यापासून ही सुनावणी सुरू झालेली आहे. विधानसभेचे सभापती राजेश पाटणेकर ही सुनावणी घेत आहेत. 

नीळकंठ हळर्णकर, आतानासिओ मोन्सेरात, जेनिफर मोन्सेरात, फ्रान्सिस सिल्वेरा, आंतोनिओ फर्नांडिस, विल्फ्रेड डिसा, फिलीप नेरी रॉड्रिग्ज, इजिदोर फर्नांडिस, चंद्रकांत कवळेकर, मनोहर आजगावकर आणि दीपक पाऊसकर यांच्याविरोधात काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर आणि मगोचे आमदार सुदिन ढवळीकर यांनी अपात्रता याचिका सादर केल्या आहेत.

गोव्यातील ग्राहकांसाठी मुंबईत 22 मार्च रोजी डाक अदालत 

सभापती या याचिकेवर सुनावणी घेत नाहीत म्हणून चोडणकर  व ढवळीकर यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे तेथे ती याचिका प्रलंबित असून मागील सुनावणीवेळी सॉलिसिटर जनरल यांनी ही याचिका सुनावणीसाठी ठेवण्यात आली असल्याकडे सर्वोच्च न्यायालयाचे लक्ष वेधले होते.

जायफळ फलावरण टॉफी उत्पादन प्रक्रियेमधील  ICAR CCARI तंत्रज्ञानाचं व्यावसायिकीकरण होणार 

संबंधित बातम्या