नवीन लोकायुक्त केंव्हा मिळणार? आज होणार फैसला

गोमन्तक वृत्तसेवा
शुक्रवार, 28 ऑगस्ट 2020

सरकारी खात्यातील तक्रारी व आरोपांची चौकशी करण्याच्या उद्देशाने गोवा लोकायुक्त कायदा २०११ अस्तित्वात आणण्यात आला होता. विद्यमान लोकायुक्त हे सेवानिवृत्त होणार असल्याची जाणीव गोवा सरकारला असूनही पुढील लोकायुक्तांचा शोध घेण्याची प्रक्रिया सुरू करण्याची गरज आहे मात्र ती अजूनही झालेली नाही. 

पणजी: राज्याचे विद्यमान गोवा लोकायुक्त पी. के. मिश्रा हे येत्या १७ सप्टेंबरला सेवानिवृत्त होणार असल्याने त्यांच्या जागेवर नवीन गोवा लोकायुक्त निवडण्याची प्रक्रिया अजूनही सरकारने सुरू केली नसल्याबद्दल ॲड. आयरिश रॉड्रिग्ज यांनी याचिका सादर केली आहे. ही याचिका शुक्रवारी (२८ ऑगस्ट) मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठासमोर सुनावणीसाठी येणार आहे. 

सरकारी खात्यातील तक्रारी व आरोपांची चौकशी करण्याच्या उद्देशाने गोवा लोकायुक्त कायदा २०११ अस्तित्वात आणण्यात आला होता. विद्यमान लोकायुक्त हे सेवानिवृत्त होणार असल्याची जाणीव गोवा सरकारला असूनही पुढील लोकायुक्तांचा शोध घेण्याची प्रक्रिया सुरू करण्याची गरज आहे मात्र ती अजूनही झालेली नाही. 

विविध खात्यातील भ्रष्टाचाराला व गैरव्यवहारांना मोकळीक देण्यासाठी सरकार नवीन लोकायुक्तांची निवड करण्याबाबत गंभीर नाही. या लोकायुक्तांकडे सरकारविरोधात अनेक भ्रष्टाचाराच्या तक्रारी चौकशीसाठी प्रलंबित आहेत. काही मंत्री व सरकारी अधिकाऱ्यांविरुद्ध खटल्यांवरील सुनावणी होऊ नये व त्या तशाच प्रलंबित राहाव्यात यासाठी सरकार लोकायुक्त नेमणूक करण्यास उत्सुक नाही. सध्या विद्यमान लोकायुक्तांची मुदत संपण्यापूर्वी नवीन लोकायुक्तची निवड करण्याच्या हेतूने उच्च न्यायालयाने गोवा सरकारला निर्देश द्यावेत, अशी विनंती रॉड्रिग्ज यांनी केली आहे.

संपादन: ओंकार जोशी

संबंधित बातम्या