बेकायदा चिरेखाणीप्रकरणी अधिकाऱ्यांची कानउघडणी

मोलेत कारवाई नाही : पोलिस, प्रदूषण मंडळाला खंडपीठाने फटकारले
Mines in Goa
Mines in Goa Dainik Gomantak

पणजी: बरकटे मोले येथील सर्वे क्रमांक 33/1 मध्ये सुरू असलेल्या बेकायदा चिरेखाणी प्रकरणी अनेक तक्रारी असूनही त्याविरुद्ध कारवाई केली जात नसल्याबद्दल आज मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाने संबंधित खात्याच्या अधिकाऱ्यांना धारेवर घेत कानउघाडणी केली. उच्च न्यायालयाच्या आदेशानंतरही पूर्वतक्रारींची दखल न घेतल्याने त्याची दखल घेत पोलिस महासंचालक, खाण संचालक, प्रदूषण नियंत्रण मंडळ व इतर संबंधित अधिकाऱ्यांना प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे निर्देश देत ही सुनावणी १७ ऑगस्टपर्यंत तहकूब केली.

(Hearing of officials in case of illegal painting in goa)

Mines in Goa
वाहनावर सायकल स्टँड लावणे बेकायदेशीर

या बेकायदा चिरेखाणी प्रकरणी बुधो अर्जून गावकर यांनी याचिका सादर केली आहे. याचिकादारातर्फे ॲड. ओमकार कुलकर्णी यांनी बाजू मांडताना बरकटे - मोले येथे दोन वर्षापासून मोठ्या प्रमाणात अवैध उत्खनन सुरू असतानाही संबंधित यंत्रणेकडून कोणतीच कारवाई होत नसल्याचे निदर्शनास आणून देताच त्यांचा युक्तिवाद उचलून धरताना उच्च न्यायालयाने संबंधित खात्याच्या अधिकाऱ्यांची खरडपट्टी काढली.

याचिकादाराने न्यायालयात धाव घेतल्यानंतर मोले पोलिस स्थानकात दिलेली तक्रार नोंदवून घेतल्याने अधिकाऱ्यांची कानउघाडणी केली. या गंभीर प्रकरणाचा तपास काही जबाबदार पोलिस अधिकाऱ्यांकडून केला जात असल्याची माहिती पोलिस महासंचालकांनी सादर करावी. कुळे पोलिस निरीक्षकांची या कारवाईबाबत झालेल्या दिरंगाबाईबाबत चौकशी करावी. या पोलिस निरीक्षकांना मोले येथे बेकायदा चिरेखाणीचे उत्खनन होत असल्याची माहिती नसावी याबाबत प्रथमदर्शनी विश्‍वास बसणे कठीण आहे, असे निरीक्षण खंडपीठाने नोंदवले आहे.

Mines in Goa
बेसुमार दर अकारणीच्या कारणामुळे झाले वादंग

अधिकाऱ्यांना माहिती सादर करण्याचा आदेश

तक्रार दिल्यापासून संबंधित खात्याच्या अधिकाऱ्यांनी दखल घेतली असती तर ज्या मोठ्या प्रमाणात बेकायदा चिरेखाणीचे उत्खनन झाले आहे ते झाले नसते. ज्या ठिकाणी हे उत्खनन होत आहे ते पर्यावरण संवेदनशील क्षेत्र असल्याचे नमूद केले आहे व पर्यावण, वन व हवामन बदल मंत्रालयाने तसे जाहीर केलेले आहे. तरीही कारवाई न केल्याबद्दल खाण, पोलिस, प्रदूषण नियंत्रण मंडळ, धारबांदोडा उपजिल्हाधिकारी व मामलेदाराना त्यांनी आतापर्यंत कारवाईसाठी काय पावले उचलली आहेत याची माहिती देण्यास खंडपीठाने सांगितले आहे.

पोलिस ठाण्याकडून दुर्लक्ष : याचिकादाराने ही बेकायदा चिरेखाणी कोण करत आहे याची माहिती कुळे पोलिस स्थानकाला देऊनही त्याची गंभीरपणे दखल घेण्यात आली नाही व गेली दोन वर्षे हे उत्खनन सुरू ठेवण्यास मुभा दिली. गुन्हा दाखल करताना तो अज्ञाताविरुद्ध नोंद करण्यात आला आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com