अहो आश्चर्य ! गोव्यात खरंच सापडलं 'दगडाचं हृदय'

गोमन्तक वृत्तसेवा
मंगळवार, 9 फेब्रुवारी 2021

'दगडाचं काळीच' हा वाक्प्रचार यापुढे फक्त म्हण म्हणून वापरला जाऊ शकत नाही. 50 वर्षीय मृत व्यक्तीचे हृदय दगडासारखे घट्ट झाल्याचे आढळून आले आहे.

पणजी : 'दगडाचं काळीच' हा वाक्प्रचार यापुढे फक्त म्हण म्हणून वापरला जाऊ शकत नाही. कारण, एक दुर्मिळ प्रकरणात, बांबोळीतील गोवा वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयात एका 50 वर्षीय मृत व्यक्तीचे हृदय दगडासारखे घट्ट झाल्याचे आढळून आले आहे. जीएमसीच्या (गोवा वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालय) फॉरेन्सिक मेडिसिन विभागातील कनिष्ठ उच्च वैद्यकिय अभ्यासक्रमाच्या द्वितीय वर्षाचे विद्यार्थी डॉ. भरत श्रीकुमार यांनी जुलैमध्ये दक्षिण गोव्याच्या एका पार्कमध्ये मृत सापडलेल्या अज्ञात व्यक्तीच्या शरीराचे शवविच्छेदन केले होते. हृदयाचे विच्छेदन करताना, त्यांना असे आढळले की हृदयाच्या डाव्या वेंट्रिकलमध्ये मोठ्या प्रमाणावर अंतःस्रावीय कॅल्सीफिकेशन झाले होते ज्यामुळे हृदय व रक्तवाहिन्या कठोर बनून, हृदय हे खरोखरच दगडासारखे टणक झाले होते. 

नारायण राणे व मुख्यमंत्री प्रमोद सावंतानी गोमंतकीयांची माफी मागावी

“हृदय इतके कठोर होते की जणू तो एखादा दगड आहे, जीएमसीच्या वरिष्ठ तज्ञांनी मला पॅथॉलॉजी विभागाच्या मदतीने हृदयाच्या या भागावर हिस्टोपाथोलॉजिकल अभ्यास करण्याचा सल्ला दिला, त्यांच्या मते ही एक अत्यंत दुर्मिळ घटना होती."असे डॉ. श्रीकुमार म्हणाले. हिस्टोपाथोलॉजीमध्ये एखाद्या रोगाचे मुळ शोधण्यासाठी संबंधित अवयावाच्या ऊतींची सूक्ष्म तपासणी केली जाते. वैद्यकिय तपासणीत त्या मृत व्यक्तीचे हृदय कॅल्सीफिकेशनमुळे कडक झाल्याचे निष्पन्न झाले. याच वैद्यकिय परिस्थितीमुळे मूत्रपिंडात दगड देखील होतो. अशा परिस्थितीत कॅल्सीफिकेशन फायब्रोसिससह एकत्र होते. 

म्हापशात आरक्षणाचा फटका बसला खुद्द भाजपलाच

“या प्रकरणात फायब्रोसिसचे मोठ्या प्रमाणावर कॅल्सीफिकेशन झाले होते, ही परिस्थिती वैद्यकीय इतिहासात क्वचितच नोंदवली गेलली असेल. म्हणूनच मला वाटले की मी ही केस स्टडी इंडिया अकादमी ऑफ फोरेंसिक मेडिसीनच्या राष्ट्रीय परिषदेत सादर करावी.”, असे डॉ. श्रीकुमार म्हणाले. ओडिशाच्या कटक येथे एससीबी मेडिकल कॉलेजमध्ये नुकत्याच पार पडलेल्या परिषदेच्या 42व्याआवृत्तीत 'ए हार्ट सेट इन स्टोन' नावाच्या फॉरेन्सिक शास्त्रीय केस स्टडी पेपरला प्रथम पुरस्कार मिळाला होता.

 

संबंधित बातम्या