Terrible fire irrupts in Goa: मडगावात अग्नितांडव; 3 घरांसह 4 गाड्या आगीत भस्मसात

ही आग विजेच्या शॉर्ट सर्किट मुळे लागली असावी असा प्राथमिक अंदाज काढण्यात आला आहे.
Goa Fire News
Goa Fire NewsDainik Gomantak

मडगाव: येथील रावणफोंड मिलिट्री कॅम्प जवळ आज सकाळी एका घराला आणि खाली असलेल्या दुकानांना आग लागून सुमारे 50 लाखांचे नुकसान झाले. ही आग विजेच्या शॉर्ट सर्किट मुळे लागली असावी असा प्राथमिक अंदाज काढण्यात आला आहे. या आगीत घरासह तीन दुकाने आणि चार वाहनांची हानी झाली.

(Heavy fire to houses and shops at Ravanaphond margao 50 lakhs loss)

Goa Fire News
Goa Accident Case: वेरणा येथे कदंबा आणि ट्रक यांच्यात अपघात; कदंबा बस चालक किरकोळ जखमी

आज सकाळी सातच्या सुमारास ही दुर्घटना उघडकीस आली. मिलिटरी कॅम्प जवळ असलेल्या घराला आग लागल्याची वार्ता सगळीकडे पसरल्याने तातडीने अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले. सुमारे तासभर आगीशी सामना करीत अग्निशमन दलाने ही आग आटोक्यात आणली.

हे घर म्हणजे एक दुमजली इमारत असून वरच्या भागात घर मालक रहात असून खाली तीन दुकाने आहेत. त्यातील एक सोफा तयार करण्याचे दुकान आहे. या आगीमुळे या दुकानातील सामानाचे प्रचंड प्रमाणात नुकसान झाले. तर इतर दोन दुकानांना थोडीफार झळ बसली. या घराच्या बाहेर एक कार आणि तीन दुचाक्या पार्क करून ठेवल्या होत्या. त्यांचेही मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले.

Goa Fire News
Goa Mining: खाण क्षेत्राला मिळणार चालना!केंद्राने 58 ग्रेड खालील खनिज मालावरील निर्यात कर हटवला

अग्निशमन दलाने घरात जाऊन घरातील गॅस सिलेंडर बाहेर काढल्याने मोठा अनर्थ होण्यापासून वाचला. हे घर सेरा रॉड्रिग्ज यांच्या मालकीचे असून आग लागल्यावर घरातील दोन व्यक्ती लगेच बाहेर आल्यामुळे कुठलीही मनुष्य हानी झाली नाही मात्र या घराच्या मागे असलेल्या अन्य एका घरातील महिलेने हे आगीचे लोट पाहून तिची प्रकृती खाल्याने तिला इस्पितळात दाखल करावे लागले.

आसगाव येथे आग

दरम्यान, आसगाव येथे देखील आग लागण्याची दुर्घटना घडली आहे. वीज वाहिन्यांच्या संपर्कात आल्याने ट्रकमधून नेण्यात येणाऱ्या गवताच्या तयार केलेल्या झोपड्या जळून खाक झाल्या आहेत. यावेळी वाहतूक पोलिसांनी दाखवलेल्या कर्तव्यदक्ष भूमिकेमुळे मोठी दुर्घटना टळली आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com